नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
बैलगाडी शर्यतीवर ( bullock cart race ) आज ( दि. ६) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने याप्रकरणी अन्य राज्यांना नोटीस बजावली असून त्यांनी १५ डिसेंबरपूर्वी आपली म्हणणं मांडायचं आहे. आता पुढील सुनावणी १५ डिसेंबर रोजी होणार आहे.
महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली आहे. राज्यात बैलगाडी शर्यतीवरील बंदी रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही बंदी मागे घेण्यात यावी, यासाठी राज्यातील अनेक ठिकाणी आंदालनेही झाली आहेत. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयत सुनावणी झाली. आता पुढील सुनावणी १५ डिसेंबर रोजी होणार आहे. याकडे बैलगाडी स्पर्धा आयोजकांसह ग्रामीण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
हेही वाचलं का?