पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (१ फेब्रुवारी, बुधवारी) त्यांचा पाचवा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी आज गोबर धन योजनेंतर्गत 500 नवीन 'वेस्ट टू वेल्थ' प्लांट्स उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. यासाठी 10 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. (Budget 2023-24 )
यंदाच्या अर्थसंकल्पात पीएम किसान सन्मान निधी योजनेतील (PM Kisan Yojana) हप्त्यांच्या रक्कमेत वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. पण यंदाच्या अर्थसंकल्पात ही योजना 'जैसे थे' राहिली आहे.(Budget 2023)
मोदी सरकारने सुरु केलेली गोबर धन योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण स्वच्छते बरोबरच जनावरांचे शेण आणि शेतातील टाकाऊ अवशेष यापासून कंपोस्ट, बायोगॅस आणि बायो सीएनजीमध्ये रुपांतर करणे. त्याचबरोबर जनावरे आणि सेंद्रिय कचऱ्यापासून संपत्ती आणि ऊर्जा निर्माण करणे हे आहे.
हेही वाचा