पुढारी ऑनलाईन : ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू (Brazilian football star Neymar) नेमार याच्या घरी पाळणा हलला आहे. नेमार आणि त्याची गर्लफ्रेंड ब्रुना बियानकार्डी (Bruna Biancardi) यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. ब्रुनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका पोस्टद्वारे ही गुड न्यूज शेअर केली आहे. (Neymar new baby)
"आमची मावी आमचे जीवन पूर्ण करण्यासाठी आली आहे. वेलकम डॉटर! तू आम्हाला आधीच खूप प्रिय आहेस…तू आमची निवड केलीस त्याबद्दल धन्यवाद." असे ब्रुनाने म्हटले आहे.
तिने गोंडस बाळाचे अनेक फोटो शेअर केलेत. एका फोटोत नेमार आणि ब्रुनाने मावीला कुशीत घेतले आहे.
नेमार आणि ब्रुना आई- वडील झाल्याच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. ब्रुनाच्या पोस्टचा कमेंट्स बॉक्स अभिनंदनाच्या शुभेच्छांनी भरला आहे. (Neymar new baby)
दरम्यान, कॅरोलिना डँटास हिच्याशी झालेल्या रिलेशीनशीपमधून नेमारला १२ वर्षांचा मुलगा डावी देखील आहे.
हे ही वाचा :