Latest

Boxer Musa Yamak : रिंगमध्ये लढत सुरू असताना बॉक्सरचा हृदयविकाराने मृत्यू

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढारी ऑनलाईन डेस्क : अलीकडेच अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या निधनामुळे क्रीडा जगतावर शोककळा पसरली असतानाच बॉक्सिंग विश्वातूनही एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. बॉक्सिंग रिंगमध्ये लढत सुरू असतानाच जर्मनीच्या मुसा यामक (boxer musa yamak dies) या प्रसिद्ध बॉक्सरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या माहितीनुसार, शनिवारी म्युनिच येथे 38 वर्षीय यामक विरुद्ध युगांडाचा बॉक्सर हमजा वांडेरा यांच्यात लढत सुरू होती. ही लढत सुरू असतानाच रिंगमध्ये यामाक अचानक कोसळला. यानंतर त्याला वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा जीव गेला होता.

मुसा यामाक (boxer musa yamak dies) याच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. तुर्की अधिकारी हसन तुरान यांनी त्याच्या निधनावरून भावनिक ट्विट केले आहे. त्यांनी लिहिलंय की, 'आम्ही आमचा देशबांधव मुसा अस्कान यामकला गमावले आहे. तो अलुक्राचा एक बॉक्सर लढवय्या बॉक्सर होता. त्याने लहान वयात युरोपियन आणि आशियाई चॅम्पियनशिप जिंकली आहे. त्याला भावपूर्ण श्रद्धांजली!

मुसा यामक (boxer musa yamak dies) आणि हमजा वांडेरा यांच्यातील लाईव्ह सुरू होता. यादरम्यान सामन्याच्या तिसऱ्या फेरीला सुरुवात होण्याच्या काही वेळापूर्वी यामक रिंगमध्ये पडला. तत्पूर्वी, त्याला दुसऱ्या फेरीत वांडेराने जबरदस्त ठोसा लगावला होता. यानंतर त्याचे भान हरपले होते. तो थकलेला दिसत होता. न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालात असे म्हटले आहे की, प्रतिस्पर्धी बॉक्सरचा ठोसा छातीवर लागला असूनही तो तिसऱ्या फेरीत वांडेराशी दोन हात करण्यास तयार होता, परंतु तिसरी फेरी सुरू होण्यापूर्वीच तो रिंगमध्ये बेशुद्ध पडला. यानंतर यामकला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. येथे प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT