Urvashi Rautela Birthday 
Latest

Urvashi Rautela Birthday : ‘बर्थडे गर्ल’ उर्वशीने कापला २४ कॅरेट सोन्याचा केक अन्…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तिच्या ३० व्या वाढदिवस ( Urvashi Rautela Birthday ) मोठ्या उत्साहात साजरा करत खास बनवला आहे. चक्क उर्वशीने तिचा वाढदिवसानिमित्त २४ कॅरेट सोन्याचा केक कापल्याने सर्वत्र चर्चांना उधान आलं आहे. यानंतर तिच्यावर सोशल मीडियातून शुभेच्छाचा वर्षाव करताना कॉमेन्सचा पाऊस पाडलाय.

संबंधित बातम्या 

नुकतेच अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तिचा ३० वाढदिवस ( Urvashi Rautela Birthday ) मोठ्या उत्साहात साजरा केला. या वाढदिवसाचे काही फोटो तिने तिच्या इंन्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत उर्वशी हॉफ शोल्डर रेड रंगाच्या वनपीसमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. यासोबत तिच्या समोर टेबलावर चक्क २४ कॅरेट सोन्याचा केक दिसतोय. या सेलेब्रेशनमध्ये तिने सोन्याचा केक आणि चॉकलेट केक असे दोन्ही केक कापले आहेत. मोकळे केसांची स्टाईल, गळ्यात हार, हातात ब्रेसलेट, मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केलाय.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने #Birthday #BirthdayGirl #24CARATREALGOLDCAKE ?❤️ #LOVEDOSE 2 सेटवर वाढदिवस साजरा. धन्यवाद @yoyohoneysingh माझ्या प्रवासाच्या टेपेस्ट्रीमध्ये, तुमची उपस्थिती माझ्यासाठी खास आहे. अथक परिश्रम आणि माझ्याबद्दलची खरी काळजी यामुळे माझ्या कारकिर्दीत एक उज्ज्वल अध्याय रचला गेला आहे… असे तिने लिहिलंय आहे. यावेळी उर्वशीसोबत गायक यो यो हनी सिंहदेखील दिसत आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्यावर भरभरून शुभेच्छा देत कॉमेन्टसचा पाऊस पाडलाय. हा वाढदिवस खास करून रात्रीच सेलेब्रेट करण्यात आला आहे. या फोटोला आतापर्यत ११ लाख ९३ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. दरम्यान इतका महागडा केकवर पैसे खर्च केल्याने उर्वशीला ट्रोलही करण्यात येत आहे. याआधीही उर्वशीने तिच्या वाढदिवसावर खूपच खर्च केलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT