किंग चार्ल्स ३, sonam kapoor 
Latest

‘किंग चार्ल्स ३’ च्या कॉन्सर्टसाठी सोनमची खास तयारी; स्पेशल गाऊनचे फोटो व्हायरल

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर तिच्या अभिनयासोबत पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असते. धमाकेदार अभिनयासोबत तिच्या सौदर्यांचे चाहते दिवाने आहेत. सोनमने काहीच दिवसापूर्वी मुलगा वायु कपूर अहूजा याला जन्म दिला. वायुच्या जन्मानंतर ती पडद्यावर येण्यास सज्ज होत असून तिने अनेक मोठे- मोठे कार्यक्रमात सहभागी नोंदविली आहे. दरम्यान सोनम 'किंग चार्ल्स ३' च्या कॉन्सर्टमध्ये उपस्थित राहणार आहे. याची माहिती मिळताच चाहत्याचा आनंद द्विगुणीत झाला आहे. तर दुसरीकडे या कार्यक्रमासाठी सोनमने जोरदार तयारी केली असून एका खास गाऊनची निवड केली आहे.

अभिनेत्री सोनमला एकमेव भारतीय आहे, जिला या खास 'किंग चार्ल्स ३' च्या कॉन्सर्टसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. सोनम कपूर या सोहळ्यासाठी काय परिधान करणार याकडे चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दरम्यान आता सोनमने खास गाऊन निवड केल्याची माहिती समोर आली आहे. सोनम कोलकत्ताची डिझायनर अनामिका खन्ना आणि यूकेची डिझायनर एमिलिया विकस्टेड यांनी मिळून डिझाइन केलेला फ्लोरल गाऊनची निवड केली आहे.

डिझायनर्सनी १७ व्या आणि १८ व्या शतकातील कॅलिको प्रिंट्सपासून प्रेरणा घेवून या खास गाऊनची निर्मिती केली आहे. सोनम या सोहळ्यात 'कॉमनवेल्थ वर्च्युअलच्या स्टेवर मान्यवरांची ओळख करून देण्यासाठी उपस्थित राहणार आहे. या खास गाऊनचे फोटो सोननने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

सोमनसोबत या सोहळ्यात टॉम क्रूज, द पुसीकॅट डॉल्स आणि अन्य अनेक सेलेब्रिटीज हजेरी लावणार आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, सोनम वायूच्या जन्मानंतर आगामी 'ब्लाइंड' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT