पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि निर्माता करण जोहर याच्यातील शाब्दिक युद्ध संपण्याचे नाव घेत नाही. गेल्या काही दिवसापूर्वी करणने कंगणाला उद्देशून अनेक बॉलिवूड कलाकारांचे करिअर बर्बाद झाल्याचे म्हटले होतं. यानंतर कंगनाने करणच्या ( Kangana Vs Karan ) पोस्टचे स्क्रीनशॉट शेअर करत पुन्हा खडेबोल सुनावले आहे.
अभिनेत्री कंगना राणावतने करणच्या ( Kangana Vs Karan ) पोस्टवर लिहिले आहे की, 'एक काळ असा होता जेव्हा चाचा चौधरी, नेपोटिझम माफियांसह अनेकजण मला इंग्रजी नीट येत नसल्यामुळे माझा अपमान करायचे. आज त्याचीच हिंदी पाहून मला वाटते की, आता त्याची हिंदी चांगली सुधारली आहे. आणि भविष्यात त्यांना अजून खूप काही सुधारायचे बाकी आहे. अजून पुढे काय- काय होतं तेही बघ' असे तिने म्हटले आहे.
याआधी करणने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले होतं की, 'आम्हाला कितीही दोष दिले तरी आम्ही झुकणारे नाही. तुम्ही आम्हाला कितीही कमी दर्जा दाखविला तरी आम्ही हारणार नाही. आमच्यावर कितीही वेळा शब्दाचा मारा केला तरी चालले, मात्र, यातून काहीही निष्पण होणार नाही. आमचे जे काम आहे तोच विजय आहे.' करणच्या या पोस्टनंतर काही वेळातच कंगनाने त्याचा स्क्रीनशॉट शेअर करत तिचे प्रखट मत व्यक्त केले आहे.
कंगना राणावत नेहमी करणला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये घराणेशाहीला प्रोत्साहन देत असल्याचा दावा करत असते. यातूनच दोघांमध्ये अनेक वेळा शाब्दिक युद्ध पाहायला मिळतेय.
हेही वाचा :