पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता हृतिक रोशनची जोडी लवकरच आगामी 'फायटर' ( Fighter ) चित्रपटातून चाहत्याच्या भेटीस येत आहे. दीपिका आणि हृतिक पहिल्यांदाच ऑन-स्क्रीन एकत्रित दिसणार आहेत. या चित्रपटाची रिलीज डेटची घोषणा आधीच करण्यात आली आहे. हृतिकने आगामी 'फायटर' चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. या शुटिंगसाठी रवाना होताना दीपिका नुकतेच विमानतळावर स्पॉट झाली.
अभिनेता हृतिक रोशनने त्याच्या इंन्स्टाग्रामवर आगामी 'फायटर' ( Fighter ) चित्रपटातील फोटो शेअर करून हा चित्रपट २५ जानेवारी २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार असल्याची माहिती दिली होती. यानंतर चाहत्यांना दीपिका आणि हृतिक दोघांना पहिल्यांदाच ऑन-स्क्रीन पाहण्याची उत्सुकता लागली होती. याच दरम्यान आता हृतिकनंतर बॉलिवूड अभिनेत्री दीपिकादेखील या चित्रपटासाठी रवाना होत असल्याचा एका व्हिडिओ समोर आला आहे.
दीपिकाचा विरल भयानी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती लेडी-बॉसच्या लूकमध्ये एकदम बिनधास्त मुंबईच्या विमान तळावर दिसली. यावेळी दिपिकाने मोठ्या आकाराच्या ब्लॅक रंगाच्या ब्लेझरसोबत व्हाईट रंगाचे डेनिम परिधान केले होते. तर यावेळी दिपिका तिच्या कारमधून उतरत असून तिच्या डोळ्यावर चष्मा आणि पायात ब्लॅक रंगाचे बूट दिसत आहेत. यावेळी ती आगामी फायटर चित्रपटाच्या शूटिंगला निघाल्याची माहिती मिळतेय.
दीपिका -हृतिकसोबत या चित्रपटात अनिल कपूर हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद करत आहेत. हा चित्रपट भारतातील पहिला एरियल ॲक्शन थ्रिलरवर आधारित आहे. यामुळे या चित्रपटाची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हेही वाचलंत का?
(video: viralbhayani instgram वरून साभार)