नवी दिल्ली : 'अति सर्वत्र वर्जयेत' हे चहा, कॉफी, चॉकलेट, मीठ आणि साखर अशा सर्वच गोष्टींबाबत लक्षात ठेवावे लागते. जास्त प्रमाणात कॉफी पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. विशेषतः जेव्हा तुम्ही त्यामध्ये साखर मिसळून पिता. अशा परिस्थितीत आरोग्याला काही हानी पोहोचणार नाही या विचाराने लोक अनेकदा साखरेशिवाय कॉफी निवडतात, ज्याला ब्लॅक कॉफी असेही म्हणतात. तथापि, हे पूर्णपणे सत्य नाही. आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या ब्लॅक कॉफीचे अनेक तोटे देखील आहेत, ज्यांची तुम्हाला कदाचित माहिती नसेल. ब्लॅक कॉफीचे फायदे आहेत त्यापेक्षा जास्त त्याचे नुकसान आहेत.
ब्लॅक कॉफीचे अतिप्रमाणात सेवन केल्यावर शरीरावर वाईट परिणाम होतो. यामुळे झोपेशी संबंधित विकार होऊ शकतात. सोबतच स्लीप सायकल म्हणजेच झोपेचे चक्र प्रभावित होते. अशावेळी झोपेआधी कॉफी पिणे टाळावे. जास्त प्रमाणात ब्लॅक कॉफी प्यायल्याने झोप तर खराब होतेच; पण त्यामुळे पोटाच्या समस्याही होऊ शकतात. ब्लॅक कॉफीमुळे तुमच्या पोटात जळजळ होऊ शकते. ज्यामुळे आम्लपित्त, छातीत जळजळ आणि बद्धकोष्ठता देखील होऊ शकते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
ब्लॅक कॉफी जास्त प्रमाणात प्यायल्याने शरीरातील स्ट्रेस हार्मोन्सचे प्रमाण वाढते, ज्यामुळे तणाव आणि चिंताग्रस्त समस्या उद्भवू शकतात. याशिवाय, जास्त ब्लॅक कॉफी प्यायल्यानंतर अस्वस्थ वाटू शकते. जेव्हा तुमच्या शरीरात ब्लॅक कॉफी जास्त असते, तेव्हा तुमच्या शरीराला आवश्यक खनिजे जसे की लोह, कॅल्शियम आणि झिंक शोषून घेणे कठीण होते. ज्यामुळे पोषक तत्त्वांची कमतरता होऊ शकते.
हेही वाचा :