पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद मोदी यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी यांनी ३०३ अधिकहून जागा जिंकण्याचे आवाहन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले. PM Modi
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी लोकसभा निवडणुकीबाबत विचारमंथन झाले.
संबंधित बातम्या
पंतप्रधान मोदी म्हणाले की, तरुण, गरीब, महिला आणि शेतकरी यांना डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजे. सर्व नेत्यांना मिशन मोडमध्ये काम करावे. जर आमच्या योजना गरीब, तरुण, शेतकरी आणि महिलांपर्यंत योग्य मार्गाने पोहोचल्या, तर त्याचा आम्हाला निवडणुकीत फायदा होईल.
दरम्यान, भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी बैठकीत बोलताना लोकसभा निवडणुकीत 10 टक्के मते वाढवण्यासाठी बूथ स्तरावर काम करावे लागेल.
दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 303 जागा जिंकणाऱ्या भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 350 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भाजपने एकट्याने 350 पेक्षा जास्त जागांचे लक्ष्य गाठले, तर एनडीएतील मित्रपक्षांसह आगामी सार्वत्रिक निवडणुकीत एकूण जागा 400 च्या आसपास पोहोचण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.