पुढारी ऑनलाईन ; एका उद्योगपतीला वाचवण्यासाठी संपूर्ण भाजप कामाला लागले आहे. देशातली लोकशाही संपत चालली आहे. आम्हाला यावर बोलू दिलं जात नाही. भाजपचं एकमेव धोरण म्हणजे सत्ता आहे. भाजपला सत्ता मिळवण्यासाठीच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका एकत्र घ्यायच्या आहेत असे संजय राऊत म्हणाले. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना संसदेत बोलू दिलं जात नाही म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. यावेळी राज्यातल्या रेशनकार्डावर मिळणाऱ्या आनंदाच्या शिध्यावर बोलताना अहो अजून लोकांना दिवाळीचा आनंदाचा शिधा मिळालेला नाही. शिधा फक्त खोक्यातून मिळतो तोही आमदारांना असा खोचक टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला.
उद्योगपती गौतम अदानींना वाचवण्यासाठी सारा भाजप कामाला लागला आहे. त्यांना वाचवण्यासाठी भाजप एक अधिवेशन संपवायला चाललंय. म्हणत देशातली लोकशाही संपत चालली आहे. विरोधकांना बोलण्याचं स्वातंत्र्य राहिलेलं नाही. त्यांचा आवाज दाबण्यासाठी विविध यंत्रणाचा वापर होत आहे जे देशाच्या आजवरच्या इतिहासात कधीच झाले नाही.
भाजपचं एकमेव धोरण म्हणजे सत्ता आहे. भाजपला सत्ता मिळवण्यासाठीच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका एकत्र घ्यायच्या आहेत. भाजपचं एकच धोरण पैशासाठी सत्ता आणि सत्तेसाठी पैसा हे आहे. मात्र तुम्ही निवडणूका केंव्हाही घ्या, आम्ही तयार असल्याचे आव्हान त्यांनी यावेळी सरकारला दिले. तसेच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक केव्हा घेता ते सांगा असे ते म्हणाले.
बाळासाहेबांची शिवसेना कोणालातरी द्यायची म्हणून भाजपने केलेला हा सौदा आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाचा केलेला गैरवापर हे देशाच्या इतिहासात याआधी कधीही घडलं नाही अस ते म्हणाले. तसचे उद्धव ठाकरे यांची २६ मार्चला ऐतिहासिक सभा मालेगाव मध्ये होणार आहे. याची तयारी चालू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा :