पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि दिल्लीतील सत्तारुढ पक्ष आम आदमी पक्ष (आप) मधील आरोप-प्रत्यारोपांचे सत्र कायम सुरुच असते. दोन्ही पक्ष आपल्या नेत्यांवर मनसोक्त टीका करतात. काही घडलं तर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आता पुन्हा एकदा याची प्रचिती आली आहे. यावेळी निमित्त आहे आपचे खासदार राघव चड्ढा ( APP MP Raghav Chadha ) यांना कावळ्याने केलेल्या हल्ल्याचे.
त्याच असं झालं, आपचे खासदार राघव चड्ढा हे संसदेबाहेर फोनवर बोलत येत होते. यावेळी त्यांच्यावर कावळ्याने हल्ला केला. हा प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला. काही मिनिटांमध्ये तो व्हायरलही झाला. यावर भाजपने टीका करण्याची संधी सोडली नाही. ( APP MP Raghav Chadha )
भाजपचे नेते तेजिंदर पाल सिंग बग्गा यांनी या प्रसंगाचा फोटो ट्विट केला करत त्यांची खिल्ली उडवली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "माननीय खासदार राघव चड्ढा जी यांच्यावर कावळ्याने केलेल्या हल्ल्याच्या बातमीने माझे मन खूप व्यथित झाले आहे. आशा आहे की तुमची तब्येत चांगली असेल." 'झूठ बोले कौवा काटे' असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :