Latest

Sana Khan Murder: भाजप नेत्या सना खान यांचा मृतदेह नर्मदा नदीपात्रात सापडला ?

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या नेत्या सना खान (Sana Khan Murder) यांचा मृतदेह नर्मदा नदी पात्रात आढळला. मध्यप्रदेशातील नर्मदापुरम, हरदामार्गे सिहोरा गावात घटनास्थळापासून सुमारे 400 किलोमीटरवर मृतदेह सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, हा मृतदेह सना खान यांचाच आहे का ? याविषयीची अद्याप खात्री पटलेली नाही. स्वतः आरोपी पती अमित उर्फ पप्पू शाहू तसेच सनाच्या नागपुरातील कुटुंबियांकडून ओळख पटल्यानंतरच पोलिसांची पुढील कार्यवाही सुकर होणार आहे.

याशिवाय नदीपात्राजवळच एक विहीर असल्याने हा मृतदेह नदीत वाहून आलेला की, विहिरीतीलच आहे, अशीही शंका पुढे आली आहे. सना खान (Sana Khan Murder) यांची आर्थिक वादातून डोक्यात काठीचे वार करून हत्या करण्यात आली आहे.  एप्रिलमध्येच मारेकरी अमित आणि सना यांचे लग्नही झाल्याचे उघडकीस आले आहे. जबलपूर येथून कुख्यात गुन्हेगार असलेल्या अमित शाहू व त्याचा मित्र अशा दोघांना अटक करून नागपुरात आणण्यात आल्यावर न्यायालयाने आरोपींना 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. हॉटेल उघडण्यासाठी सनाने अमितला रोख रक्कम आणि सोने दिले होते. दरम्यान, सनाच्या मोबाईलमध्ये काही क्लिप्स बघितल्यापासूनच अमितचे तिच्याशी बिनसले, तिने आपले पैसे परत मागितले, ते घेण्यासाठी ती जबलपूरला गेली. काटा काढण्यासाठी सज्ज असलेल्या अमितला वादावादीनंतर आयती संधी मिळाली, अशी प्रारंभिक तपासात माहिती पुढे आली आहे. काठीने मारहाण करीत अमितने आपल्याच घरी सना खानची हत्या केली.

आपल्या कारने मृतदेह हिरन नदी पात्रात नेऊन फेकला. मात्र, हिरन व नर्मदा नदीला पूर आल्याने नदीपात्रात सना खान यांच्या मृतदेहाचा शोधाशोध करण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेपुढे कायम आहे. आता सुमारे 15 दिवसानंतर सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे दुसरे आव्हान असून प्रसंगी डीएनए टेस्ट पण केली जाऊ शकते. 1 ऑगस्टला सना खान रात्री तडकाफडकी नागपूरवरून जबलपूरला गेली. मात्र, नंतर कुठलाही संपर्क न झाल्याने त्या बेपत्ता झाल्याची तक्रार आईने मानकापूर पोलिसांत दिली. त्यानंतर  मानकापूर पोलिसांची दोन पथके जबलपूरकडे रवाना झाली. आता ही हत्या आर्थिक कारणावरून की आणखी कशातून करण्यात आली, सना खानच्या मोबाईलमध्ये काय दडले आहे, याचा उलगडा लवकरच आरोपींच्या पीसीआर दरम्यान पोलिस तपासात होणार आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT