पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपळे निलखचे नगरसेवक तुषार कामठे यांनी गुरुवारी आपल्या नगरसेवकपदाचा आणि भाजपाच्या त्याग केला आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मुख्य प्रवक्ते योगेश बहल, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे उपस्थित होते.