पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणुकीसाठी बिजू जनता दलाने ( बीजेडी) उमेदवारांची पहिली यादी आज (दि.२७ मार्च) जाहीर केली. ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजेडी प्रमुख नवीन पटनायक स्वतः हिंजली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ( Odisha State Assembly election)
लोकसभा निवडणुकाबरोबच ओडिशातील विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने लाेकसभेच्या आठ मतदारसंघात तर विधानसभेच्या 23 जागा जिंकल्या होत्या. तर बिजू जनता दलाने १२ लोकसभा मतदारसंघात तर 112 विधानसभा मतदाससंघात विजय मिळवला होता.
हेही वाचा :