पुढारी ऑनलाइन डेस्क : ED Actions : गेमिंग ॲप आणि ई-नगेट्स संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कोलकाता येथे ईडी (अंमल बजावणी संचालनालय) ने मोठी कारवाई केली. कारवाईत केंद्रीय तपास यंत्रणेने ई-नगेट्सचा या गेमिंग ॲपचा मालक आमिर खान आणि इतरांच्या मालकीचे तब्बल 12.83 कोटी रुपयांचे कोटी रुपयांचे बिटकॉइन्स जप्त केले आहेत. काल बुधवारी (दि28) ही कारवाई करण्यात आली आहे.
ED Actions : याप्रकरणी ईडीच्या अधिका-यांनी माहिती अधिक माहिती दिली. पीएमएलएच्या तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपी आमिर खानवर मोबाईल गेमिंग ॲपद्वारे कोट्यावधींची फसवणूक केल्याचे आरोप आहे. अशी माहिती अधिका-यांनी दिली. ते म्हणाले, ईडीने नुकतेच कोलकाता येथील गार्डन रीच येथील आमिरच्या घरातून 17 कोटी रुपये जप्त केले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
ED Actions : काय आहे नेमके प्रकरण
आमिरने e.nuggets नावाचे मोबाइल गेमिंग ॲप्लिकेशन लॉन्च केले होते. हे एक ॲप होते ज्याद्वारे तो सुरुवातीला पैसे द्यायचा. त्यानंतर तो ई-वॉलेटच्या माध्यमातून ग्राहकांचे पैसे काढत असे. याविषयी काही तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर कारवाई करून आमिरला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून अटक केली होती. त्याला 24 सप्टेंबर रोजी न्यायालयाने 14 दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली होती.
हे ही वाचा :