Latest

बिलोली विधानसभा पोटनिवडणूक : काँग्रेसचे अंतापूरकर आघाडीवर

backup backup

बिलोली विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणीला सकाळी प्रारंभ झाला. ही लढत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर आणि भाजप उमेदवार सुभाष साबळे यांच्यात थेट लढत सुरू आहे. दरम्यान काँग्रेसने या पोटनिवडणुकीत बिलोली मतदारसंघातून आघाडी घेतली आहे. पहिल्या टप्प्यात टपाली मतदान घेण्यात आले.

या टपाली मतदानामध्ये जितेश अंतापूरकर यांनी आघाडी घेत ४४ मते मिळवली. तर भाजपचे उमेदवार सुभाष साबळे यांना ३२ मते मिळाली. पहिल्या पाच फेऱ्या झाल्या असून या पाचही फेरीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी आघाडी घेतली आहे.

बिलोली विधानसभा पोटनिवडणूक : अंतापूरकर यांची आघाडी कायम

पहिल्या फेरीत जितेश अंतापूरकर यांना ४२१६ मते मिळाली तर भाजप उमेदवार सुभाष साबणे यांना २५९२ मते मिळाली. जनता दलाचे विवेक केरुरकर यांना बारा मते मिळाली. या फेरीमध्ये नोटाला २१ मते मिळाली. दुसऱ्या फेरीत अंतापूरकर यांना ३०७८ तर भाजपचे सुभाष साबणे यांना २४४७ दुसऱ्या फेरी अखेर २२९३ मतांनी अंतापूरकर यांनी आघाडी घेतली.

तिसऱ्या फेरीत अंतापूरकर यांना ३२६४ मतांची आघाडी मिळाली. तर चौथ्या फेरीअखेर काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना ४५५७ मतांची आघाडी घेतलेली आहे. तर पाचव्या फेरी अखेर जितेश अंतापूरकर यांना ६१७० मतांची आघाडी घेतलेली आहे. याचबरोबर अद्यापही तेवीस फेऱ्या बाकी असल्याने लढत शेवटच्या फेरी पर्यंत चुरशीची होणार असे बोलले जात आहे.

फेरी क्रम.–18

१.जितेश अंतपुरकर (काँग्रेस) 3442

२.सुभाष साबणे (भाजप) 2266

काँग्रेस आघाडी 23878 वर एकूण आघाडी

फेरी क्रम –13

१.जितेश अंतपुरकर (काँग्रेस) 4186

२.सुभाष साबणे (भाजप) 2123

काँग्रेस आघाडी 16238 वर एकूण आघाडी

फेरी क्रम.–12

१.जितेश अंतपुरकर (काँग्रेस) 3821

२.सुभाष साबणे (भाजप) 2226

काँग्रेस आघाडी 14175 वर एकूण आघाडी

फेरी क्रम.–11

१.जितेश अंतपुरकर (काँग्रेस) 3969

२.सुभाष साबणे (भाजप) 2320

काँग्रेस आघाडी 12580 वर
एकूण आघाडी

फेरी क्रम.–10

१.जितेश अंतपुरकर (काँग्रेस) 3524

२.सुभाष साबणे (भाजप) 3138

काँग्रेस आघाडी 10969 वर
एकूण आघाडी

फेरी क्रम.–9

१.जितेश अंतपुरकर (काँग्रेस) 3693

२.सुभाष साबणे (भाजप) 2612

काँग्रेस आघाडी 10583 वर एकूण आघाडी

फेरी क्रम.–8

१.जितेश अंतपुरकर (काँग्रेस) 3999

२.सुभाष साबणे (भाजप) 2709

काँग्रेस आघाडी 9502 वर एकूण आघाडी

फेरी क्रम.–7

. जितेश अंतापूरकर (काँग्रेस) 3044

२. सुभाष साबणे (भाजप) 2600

काँग्रेस आघाडी 8212 वर एकूण आघाडी

फेरी क्रम.–6

१. जितेश अंतापूरकर (काँग्रेस) 4087

२. सुभाष साबणे (भाजप) 2487

काँग्रेस आघाडी 7768

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT