पुढारी ऑनलाईन डेस्क : नुकतेच प्राइमेट्स जीनोमवरील नवीन संशोधनात आपण मानव होण्याबाबतच्या प्रक्रियेवर प्रकाशझोत पडला आहे. तसेच मानवांमध्ये रोग-उद्भवणाऱ्या अनुवांशिक उत्परिवर्तनांबद्दल महत्त्वपूर्ण नवीन माहितीही मिळण्यास मदत करणारा ठरला आहे. प्राइमेट्स ( सामान्य पूर्वज सामायिक करणारे सस्तन प्रजाती ) जीनोम (कोणत्याही सजीवाची डीनएच्या स्वरूपामध्ये असलेली सर्व माहिती देणारा आराखडा ) वरील नवीनसंशोधनाविषयी जाणून घेऊया…
आज जगात प्राइमेटच्या ५०० हून अधिक प्रजाती अस्तित्वात आहेत, ज्यात मानव, माकडे, वानर, लेमर, टार्सियर आणि लॉरिस यांचा समावेश आहे. अनेकांना हवामान बदल, अधिवास नष्ट होणे आणि अवैध शिकार यांचा धोका आहे. संशोधकांनी सर्व प्राइमेट प्रजातींपैकी जवळपास निम्म्या जीनोम्सचा क्रम लावला, जगभरातील २३३ प्रजातींमधील ८०० हून अधिक जीनोमची तपासणी केली, जे प्राइमेटच्या सर्व १६ कुटुंबांचे प्रतिनिधित्व करतात.
जगात प्रथमच असा प्रयोग झाला. यामध्ये २४ देशांमध्ये शास्त्रज्ञांनी 233 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्राइमेट प्रजातींचे DNA मॅप केले आहे. त्यांनी सुमारे ८०० जंगली आणि बंदिवान प्राइमेट्सचे रक्त नमुने गोळा केले. जर्नल सायन्समध्ये प्राइमेट्स जीनोमवरील नवीन संशोधन प्रकाशित झाले आहे. या संशोधनाचे प्रमुख आणि स्पेनमधील बार्सिलोना येथील पॉम्पेयू फॅब्रा विद्यापीठातील जीनोमिक्स संशोधक लुकास कुडेर्ना यांनी सांगितले की, "सध्याच्या जैवविविधतेच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर नवीन संशोधन मानवाला होणार्या आनुवंशिक रोगांबद्दलची आपली समज आणखी प्रगल्भ होण्याची क्षमता आहे. तसेच मानवी उत्क्रांती अभ्यासासाठी, मानवाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हे संशोधन मोलाची मदत करणारे ठरणार आहे."
नवीन संशोधनात २३३ प्राइमेट प्रजातींच्या जीनोम अनुक्रमित केले आणि त्यांचे विश्लेषण करण्यात आले. काही अनुवांशिक भिन्नता ज्यांना पूर्वी केवळ मानवासाठीच मानले जात होते ते इतर प्राइमेट प्रजातींमध्ये आढळले होते. "प्राइमेट्समध्ये मानवाचा समावेश होता. मात्र मानवाचे वैशिष्ट्य असे आहे की, त्याच्याकडे मोठा मेंदू, उच्च गुणवत्ता आणि चांगली दृष्टी आहे. प्राइमेट्समधील चिंपांझी आणि बोनोबोस हे अनुवांशिकदृष्ट्या मानवाच्या सर्वात जवळचे आहेत, अभ्यासात प्राइमेट्सच्या उत्पत्तीचा समूह म्हणून शोध घेण्यात आला.
या संशोधनातील सहअभ्यासक आणि अमेरिकेतील टेक्सासमधील बेलर कॉलेज ऑफ मेडिसिनचे जीनोमिस्ट जेफ्री रॉजर्स यांनी सांगितले की, या संशोधनामुळे अनुवंशिक बदलावर खुलासा झाला आहे. बहुसंख्य प्राइमेट प्रजातींमध्ये मानवांपेक्षा जास्त अनुवांशिक भिन्नता असते. यावरून असे दिसून येते की, प्राचीन मानवी लोकसंख्येतील अनुवांशिक भिन्नतेचे प्रमाण आणि स्वरूप बदलले आहे. शास्त्रज्ञांनी प्राइमेट जीनोमचा वापर कृत्रिम बुद्धिमत्ता अल्गोरिदमला प्रशिक्षित करण्यासाठी मानवांमध्ये रोग-उद्भवणाऱ्या अनुवांशिक उत्परिवर्तनांचा अंदाज लावण्यासाठी केला आहे. जीनोम डेटा प्राइमेट प्रजाती ओळखण्यास मदत करू शकतो, असेही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
या संशोधनाबद्दल माहिती देताना इलिनॉय युनिव्हर्सिटी ऑफ अर्बाना-चॅम्पेनमधील जैविक मानववंशशास्त्रज्ञ एमेरिटस पॉल गार्बर यांनी म्हटले आहे की "जंगली प्राइमेट्सचे अनुवांशिक नमुने मिळविण्यासाठी खूप वेळ, मेहनत आणि सरकारी परवानगी लागतात. आणि अस्तित्वासाठी लढणार्या प्रजातींवर हा प्रयोग करणे अधिक जोखीमेचे आहे. आम्ही प्राइमेट जीनोमिक्सबद्दल जितके अधिक समजू, तितकेच आपल्याला मानवी जीनोमिक्सबद्दल आपली माहिती अधिक ठळक होणार आहे.
हेही वाचा :