जया बच्चन, अमिताभ बच्चन, रेखा  
Latest

अमिताभ यांनी जयासमोर रेखाला लावला रंग, पुढे असं काही झालं की…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : एक काळ असा होता की अमिताभ आणि रेखाच्या अफेअरची जबरदस्त चर्चा होती. एकदा अमिताभने जयाच्या समोर रेषा रंगवली होती आणि जयाचा चेहरा उतरला होता. चित्रपट आणि दमदार अभिनयासोबतच मेगास्टार अमिताभ बच्चन त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ते चर्चेत असतात. १९७३ मध्ये बिग बींनी अभिनेत्री जया बच्चनसोबत लग्न केले होते. त्याचवेळी त्यांचे नाव अभिनेत्री रेखासोबतही जोडले गेले. त्या काळात अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. इतकंच नाही तर होळीच्या निमित्ताने अमिताभ यांनी जया यांच्यासमोर रेखा यांना रंग लावला होता.

हा किस्सा १९८१ मध्ये आलेल्या सिलसिला चित्रपटाचा आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखा आणि संजीव कुमार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या रोमँटिक चित्रपटात अमिताभ बच्चन, जया आणि रेखा यांच्या खऱ्या प्रेमकथेची झलक पाहायला मिळाली. तसेच या चित्रपटातील रंग बरसे हे गाणेही प्रचंड लोकप्रिय ठरले. याचे एकमेव कारण म्हणजे रेखा जया आणि अमिताभ यांच्यातील प्रेमाचा त्रिकोण.

या चित्रपटात होळीचा एक सीन दाखवण्यात आला होता. ज्यामध्ये हे कलाकार एकमेकांसोबत रंग खेळताना दिसत आहेत. या गाण्यादरम्यान अनेकवेळा अमिताभ रेखाला रंग लावताना दिसत आहेत. या चित्रपटात रेखा या संजीव कुमार यांची पत्नी दाखवण्यात आली आहे. तर जया बिग बींची पत्नी आहे. या गाण्याच्या दरम्यान अनेक वेळा अमिताभ रेखाला रंग लावताना दाखवण्यात आलं आहे. तेव्हा संजीव कुमार आणि जया हे दृश्य दुरून पाहत असतात.

हे चित्रपटात दाखवण्यात आलं असलं तरी असं म्हटलं जातं की, त्यांच्या रिअल लाईफमध्येही अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. जया बच्चन स्वतः अमिताभ यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी शूटिंग सेटवर पोहोचत असत. मीडिया रिपोर्टनुसार, एकदा राम बलराम चित्रपटाच्या सेटवर जया बच्चन रागाच्या भरात पोहोचल्या आणि त्यांनी रेखाला खडसावले होते.

लग्नानंतर अमिताभ – रेखा यांच्या अफेअरच्या बातम्यांनी जया बच्चन वैतागल्या होत्या, 'सिलसिला' हा अमिताभ आणि रेखा यांचा शेवटचा चित्रपट होता. यानंतर दोघांमध्ये इतकं अंतर निर्माण झालं की खऱ्या आयुष्यात दोघेही एकमेकांसमोर आले तरी नजर चुकवतात!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT