Latest

Pune news : भिगवणला एस.टी. बसचा ब्रेक फेल ; मोठी दुर्घटना टळली

अमृता चौगुले

भिगवण:पुढारी वृत्तसेवा : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण येथे एस.टी.बसचा ब्रेक निकामी होऊन झालेल्या अपघातात भिगवण येथील एक जण जागीच ठार झाला आहे. तर मोठी जीवित हानी ही टळल्याचे चित्र पुढे आले आहे. हा अपघात सोमवारी( दि.२) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की भिगवण येथील बस स्थानकातून पुणे-बार्शी कळंब( एमएच २० बीएल ३८७७) ही एसटी बस पुणेकडून सोलापूर कडे भिगवणच्या सेवा रस्त्यातून निघाली होती.

ही बस स्थानकापासून साधारण तीनशे फूट पुढे आल्यानंतर गाडीचा ब्रेक निकामी झाला त्यामुळे गाडीच्या पुढे असलेल्या एका दुचाकीला एसटी बस धडकली त्यामध्ये एक जण जागीच ठार झाला.त्यांनतर ही बस कठड्याला धडकून जागेवर थांबली.या भागात बरीच वर्दळ असते परंतु सुदैवाने पुढील मोठी जीवितहानी टळली. याबाबत भिगवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान एसटीचा ब्रेक फेल नक्की झाला का याची पडताळणी करता तो फेल झाल्याचे सुकृतदर्शनी पोलिसांना आढळले आहे. असे असले तरी अजूनही याची सत्यता पडताळण्यात येणार असल्याचे भिगवणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले. एसटीचा चालक व मृत व्यक्तीचे पूर्ण नावे अद्याप समजलेले नव्हती.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT