Latest

भय्यू महाराज- तरुणीचे व्हॉट्स ॲप चॅट कोर्टात सादर; बीएम ला वेडे करायचेय…

backup backup

इंदूर, पुढारी ऑनलाईन:  अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणातील पलक नावाची तरुणी आणि अन्य एका व्यक्तीचे व्हॉट्स ॲप चॅट कोर्टात सादर केले आहे. यात बीएम म्हणजे भैय्यू महाराज यांना वेडे करायचे आहे, असे चॅट समोर आले आहे.
भोपाळच्या फॉरन्सिक अधिकाऱ्याने १०९ पानाचं व्हॉट्सअप चॅट कोर्टासमोर सादर केले आहे. त्यात पलक आणि पीयूष जीजू यांच्यातील संवाद आहेत.

आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी तीन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. जून २०१८ मध्ये त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. त्यानंतर पलक या केअरटेकरचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला होता. यातील व्हॉट्सअप चॅट डेटा रिकव्हर केला. पलकने पीयूष जीजू या व्यक्तीसोबत भय्यू महाराजांबद्दल बोलणे केले आहे. यात महाराजांची पत्नी आयुषी आणि मुलगी कुहू यांचाही उल्लेख आहे.
या व्हॉट्सअप चॅटमधून महाराजांना आत्महत्या प्रकरणात षडयंत्र रचत असल्याचे समोर आले आहे. या संभाषणात सांकेतिक भाषा वापरली आहे. भय्यू महाराज यांच्यासाठी BM असा शब्द वापरला असून त्यांना वेडे ठरवायचे आहे असे पलक म्हणत होती. यासाठी २५ लाखांची डील ठरली होती. पोलिसांनी पलकला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केली होती. अप्पर सत्र न्यायालयात याची सुनावणी सुरू आहे.

महाराजांचा अश्लिल व्हिडिओ

पलकने भय्यू महाराजांचा अश्लिल व्हिडीओ बनवला होता. त्याद्वारे ती महाराजांना ब्लॅकमेल करत होती. भय्यू महाराज यांनी डॉ. आयुषीसोबत १७ एप्रिल, २०१७ रोजी लग्न केले होते. मात्र, एक वर्षाच्या आत आपल्याशी लग्न करावा असा दबाव ती टाकत होती. तिला महाराजांशी लग्न करायचे होते मात्र, त्यांनी डॉ. आयुषीशी लग्न केले.

काय आहे चॅटमध्ये?

पलक: आयुषीने मांत्रिकाला पकडलं आहे. त्याच्याशी २५ लाखांची डील झाली आहे.
पीयूष जीजू : कोणाशी?
पलक: मांत्रिकाशी
पलक: BM ला वेडं ठरवून घरात बसवायचं आहे
पीयूष जीजू – कुहू घरी येणार आहे. उद्या कुहूची रुम तयार होईल
पलक : कुहूने शरदला सांगितलं आहे. ती समोर आली तर तिला मारुन टाकेन
पलक : आयुषीने येऊन पुन्हा काम खराब केले
पलक : आयुषीने वहिनी आणि कुहूचे फोटो जाळून टाकले

काय आहे प्रकरण?

आध्यत्मिक गुरू भय्यू महाराज यांनी १२ जून २०१८ रोजी गोळी झाडून आत्महत्या केली. त्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. भय्यू महाराज यांचे राजकीय क्षेत्रात अनेक शिष्य होते. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केल्यानंतर महाराजांचा अश्लिल व्हिडिओ बनविला होता. त्यावरून त्यांना काहीजण ब्लॅकमेल करत होते असे पुढे आले. याप्रकरणी विनायक आणि शरद या त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली. त्यानंतर पलक नावाच्या तरुणीने त्यांचा अश्लिल व्हिडिओ बनविला होता, असे समोर आले. शरद, विनायक आणि पलक हे भय्यू महाराज यांना वेडे ठरवून त्यांची संपत्ती हडप करण्याच्या विचारात होते. अश्लिल फोटो आणि व्हिडिओवरून त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT