Latest

सोलापुरात सदाभाऊ खोत यांच्यासमोर राष्ट्रवादी युवकचे भजन आंदोलन

अमृता चौगुले

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : शरद पवार यांच्यावरील केतकी चितळे हिच्या पोस्टनंतर संपूर्ण महाराष्ट्रात तिच्यावर टीकेची झोड उठली. केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळेचे समर्थन केले. यानंतर सोलापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या समोर टाळ मृदंग वाजून निषेध नोंदविला.

शेतकरी आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने सदाभाऊ खोत हे सोलापूर दौर्‍यावर आले आहेत. सोमवारी (दि.१६) दुपारी तीन वाजता सदाभाऊ खोत हे शासकीय विश्रामगृहावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधत असतानाच अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर, सुहास कदम, शहर युवक अध्यक्ष जुबेर बागवान, प्रतीक पवार, मकरंद शिवशेट्टी, मुसा अत्तार, इरफान शेख, युवराज राठोड, सरफराज बागवान, तौकिर शेरी, सादिक कुरेशी यांच्यासह काही कार्यकर्ते हातात टाळ मृदुंग घेवून खोत बसलेल्या खोलीत शिरले. तसेच चितळेंचे समर्थन केल्या बद्दल खोत यांच्या विरोधात घोषणाबाजी करत 'शरद अंगार है बाकी सब भंगार हे' च्या घोषणा दिल्या. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कोणाचे समर्थन करावे हे कळत नसेल तर पांडुरंगा खोत यांना सुबुद्धी दे, असे म्हणून कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान साधून पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

त्या कार्यकर्त्या विषयी माझी तक्रार नाही : खोत

मी कष्टकरी, वंचित शेतकर्‍यासाठी लढणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यां विषयी माझी कसली ही तक्रार नाही. मात्र, शेतकर्‍यांच्या विरोधात भूमिका घेणार्‍यांच्या विरोधात मी कायम लढणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी या घटनेनंतर सांगितले. तसेच कार्यकर्त्यापैकी एकाने पवारांवर बोलणार्‍यांना शोधा आणि तोडा असा फतवा काढला असल्याची खंत व्यक्त करित यांनी केलेले कृत कितपत योग्य आहे, याचा ही शासनाने विचार करावा अशी खंत व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT