Latest

किंमत ४ लाखांच्या आत, ॲव्हरेज ३१ च्या घरात ! ‘या’ ३ बेस्ट कार माहीत आहेत का ?

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात मध्यमवर्गीयांची संख्या जास्त असल्याने कमी बजेट पण किफायतशीर वाहनांची विक्री जास्त प्रमाणात होते. दरम्यान पाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी तुम्हाला छोटीशी फॅमिली कार घरी आणायची असेल तर या वाहनांबद्दल तुम्हाला माहिती असलीच पाहिजे. तुम्हालाही नवीन कार घ्यायची आहे आणि बजेट कमी असेल आम्ही तुम्हाला ४ लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या ३ कारबद्दल माहिती देणार आहे. (Best Cars)

Best Cars : मारुती सुझुकी अल्टो

मारुती सुझुकीनंतर मागच्या २० वर्षांपासून अल्टोने भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. भारतीय बाजापेठेत मारूतीची सर्वात जास्त विक्री झालेलं वाहन म्हणून याकडे पाहिले जाते. सध्या या कारची किंमत ३ लाख २५ हजारपासून सुरू आहे. मारुती सुझुकी अल्टोला ०.८ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे ४७bhp आणि ६९Nm टॉर्क जनरेट करते.

यामध्ये आपल्याला पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही पर्याय उपलब्द आहेत. अल्टो CNG मध्ये आपल्याला एव्हरेज ३१KM पेक्षा जास्त आहे. यात ७-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, फ्रंट आणि रिअर बॉटल होल्डर, पॉवर विंडो, रिमोट की लेस एंट्री आणि फ्रंट ड्युअल एअरबॅगसह दोन-टोन डॅशबोर्ड देण्यात आले आहेत.

Best Cars : मारुती सुझुकी एस-प्रेसो

या कारची किंमत ३ लाख ८५ हजारांपासून सुरू होते (एक्स-शोरूम). यामध्ये आपल्याला १.० लिटर ३ सिलेंडर पेट्रोल इंजिनमध्ये बनवण्यात आली आहे. 67bhp/90Nm जनरेट करण्याची यामध्ये क्षमता आहे. अल्टो प्रमाणे, हा गाडी CNG मध्ये देखील उपलब्ध आहे. ही गाडी सुद्धा CNG मध्ये ३१ KM पेक्षा जास्त ॲव्हरेज देते.

एस- प्रेसो सेंट्रली माउंटेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मारुती स्मार्ट प्ले स्टुडिओसह टचस्क्रीन सिस्टम, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, यूएसबी आणि १२-व्होल्ट स्विचेस, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स यांसारख्या वैशिष्ट्यांचा या गाडीत समावेश करण्यात आला आहे.

Datsun redi-GO

Datsun redi-GO याची किंमत एक्स-शोरूम ४ लाख ५२ हजारपासून सुरू होते. यात ०.८ लीटर आणि १ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या गाडीचे एव्हरेज २२ kmpl पर्यंत कंपनीकडून देण्यात आले आहे. यात LED DRLs, LED फ्रंट फॉग लॅम्प, डिजिटल टॅकोमीटर, नवीन ड्युअल-टोन 14-इंच व्हील कव्हर, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह ८-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि की लेस एंट्री यांसारखी वैशिष्ट्ये या वाहनात देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT