मुंबई : पुढारी वृत्तसेवा सलग चौथ्या दिवशी आज (शनिवार) बेस्टमधील कंत्राटी चालकांसह इतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरूच ठेवले आहे. यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे. आज शनिवार पहाटे पासून 18 डेपोतील कंत्राटी बस सेवा ठप्प होती. सकाळच्या सत्रातील 1 हजर 77 बस रस्त्यावर उतरल्या नाहीत. त्यामुळे तब्बल 14 ते 15 लाख मुंबईकरांना प्रवासाकरीता लोकल, मेट्रो, रिक्षा, टॅक्सीने प्रवास करावा लागला.
पगार वाढीसह इतर मागण्यांसाठी बेस्टला भाडेतत्वावर बस पूरविणाऱ्या पाच कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. आंदोलनात SMT, मातेश्वरी, टाटा, हंसा आणि switch या व्यवसाय संस्थेच्या कामगारांचा समावेश आहे. तरी SMT, मातेश्वरी, हंसा आणि स्वीटच या व्यवसाय संस्थेच्या अनुक्रमे 280,90,40 आणि 6 बस शनिवारी चालविण्यात आल्या. काम बंद आंदोलनामुळे बॅकबे, कुलाबा, वरळी, आणिक, प्रतिक्षा नगर, धारावी, देवनार, शिवाजी नगर, घाटकोपर, मुलुंड, मरोळ, मजास, दिंडोशी, शिवाजी नगर, ओशिवरा, मालवणी, गोराई आणि मागाठणे अशा एकूण 18 आगारांच्या बस गाड्या प्रवर्तनावर फरक पडला. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या 104 बस देवनार, शिवाजीनगर, घाटकोपर, मुलुंड, गोराई, मागाठणे डेपोतून चालविण्यात आल्या. तसेच भाडे तत्वावरील 390 बस उपक्रमाच्या चालकाद्वारे विविध मार्गवार सोडण्यात आल्या.
बेस्ट प्रशासनाची बघ्याची भूमिका
बेस्टच्या ताफ्यातील तब्बल निेम्या बस या भाडे तत्वावरील आहेत. सध्या 32 लाख प्रवासी बेस्टने प्रवास करतात. निम्या बस रस्त्यावरून गायब झाल्याने मुंबईकराची प्रचंड गैरसोय होत आहे. बस करीता तासनतास वाट पहावी लागत आहे. प्रवाशांचे सलग चार दिवस हाल होत आहेत. तरी बेस्ट प्रशासनाने मात्र कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. कंत्राटदारावर फक्त कायदेशीर आणि दंडातमक कारवाई करण्यापलीकडे बेस्टने काहीही केलेले नाही. मुंबईकरांसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी वारंवार मुंबईकरांना वेठीला धरणाऱ्या कंत्राटदारांणा काळ्या यादीत टाकून दुसऱ्या कंपनीच्या बस घ्याव्यात अशी मागणी प्रवासी करत आहेत.
हेही वाचा :