Latest

बेळगाव : हिजाबवरून पुन्हा तणाव, काॅलेजमध्ये विद्यार्थिनींना प्रवेश नाकारला

अमृता चौगुले

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : बेळगावमध्ये आजपासून शाळा कॉलेजेस सुरू झाले असून हिजाब परिधान करून आलेल्या विद्यार्थ्यांना शाळा व कॉलेजने प्रवेश नाकारल्यामुळे कॉलेज परिसरात वादंग निर्माण झाल्याची घटना आर एल एस कॉलेजमध्ये घडली.

यापूर्वी शहरातील सरदार्स माध्यमिक शाळेमध्ये हिजाब परिधान करून आलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश नाकारल्यामुळे वादंग निर्माण झाले होते. मात्र या ठिकाणी पोलिसांनी धाव घेऊन चोख बंदोबस्त ठेवला. त्यानंतर बुधवारपासून बेळगाव शहरातील कॉलेज सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक कॉलेजच्या प्रवेशद्वारावरच हिजाब घालून शाळेच्या आवारात प्रवेश न करण्याची सूचना विद्यार्थ्यांना देण्यात येत होती. आज सकाळी आर एल एस कॉलेजच्या प्रवेशद्वारावर हिजाब परिधान करून आलेल्या तीन विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला.

विद्यार्थिनी हिजाब घालूनच आपण कॉलेजमध्ये प्रवेश करणार या भूमिकेवर ठाम राहिल्या. त्यामुळे त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून ताबडतोब पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. शेवटी त्या विद्यार्थिनींना कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. त्यांना आल्यापावली परत जाण्याचा सल्ला देण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांची सरदार कॉलेजला भेट : नियमांचे पालन करण्याचे आवाहन

पीयू आणि पदवी महाविद्यालये पुन्हा सुरू झाल्याने उपायुक्त एम. जी. हिरेमठ यांनी सरदार हायस्कूल आणि पी. यू. महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी सरदार कॉलेजला जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. हिजाब परिधान करून आलेल्या विद्यार्थ्यांना हिजाब उतरून वर्गात बसण्याचा सल्ला दिला.

विद्यार्थिनीने तो मान्य देखील केला. मात्र काही तथाकथित समाजसेवक या प्रकरणाला खतपाणी घालण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी दिला. हिजाब घालून आलेल्या शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तो कॅम्पसबाहेर काढला. शिक्षक आणि इतर कर्मचारी गेटवर उभे राहून विद्यार्थ्यांना हिजाब काढण्यास सांगत होते. विद्यार्थ्यांनी सूचनांचे पालन केले.

शालेय मुली सूचनांचे पालन करत असल्या तरी, महिला सामाजिक कार्यकर्त्यांपैकी एकाने मंगळवारी शिक्षकांशी वाद घातला की मुली हिजाब घालणे हा त्यांचा हक्क आहे म्हणून कधीही काढणार नाही. मात्र, विद्यार्थिनींनी तिची पर्वा न करता सूचनांचे पालन केले. त्यामुळे तथाकथित समाज सेवकांनी आर. एल. एस. कॉलेजमध्ये जाऊन ही जाब प्रकरणी खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना कॉलेजच्या आवारात फिरण्यास बंदी घातली. त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला.

हे ही वाचलं का  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT