Latest

बेळगाव : कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या कारला अपघात (Video)

अमृता चौगुले

चिकोडी (बेळगाव), पुढारी वृत्‍तसेवा :  कर्नाटक राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची कार कालव्यात पलटी होऊन अपघात झाला. पण सुदैवाने सवदी यांच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत वगळता कोणतीही मोठी हानी झालेली नाही.
याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, आज आपल्या घरी गणपती मूर्ती प्रतिष्ठापना करून अथणीहुन बेळगांवकडे जत- जांबोटी राज्यमार्ग 31 या मार्गावरून आपल्या कारने जात होते. सदर कार हिडकल – हारुगेरी दरम्यान आडवी आलेल्या एका दुचाकीला वाचवताना चालकाचा ताबा सुटला आणि कार नजीकच्या कालव्यात पलटी झाली.

यावेळी एअरबॅग ओपन झाली नंतर चालकाने वरचा दरवाज काढून बाहेर आला. तर यावेळी परिसरातील नागरिकांनी कारगाडीत अडकलेल्या लक्ष्मण सवदी यांना बाहेर काढले.

लक्ष्मण सवदी यांच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत व श्वास घेताना त्रास होत असल्याने हारुगेरी येथील खासगी रूग्‍णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर बेळगावकडे पुढील उपचारासाठी घेवून जाण्यात आले. सद्या लक्ष्मण सवदी यांची तब्येत ठीक असल्याचे त्‍यांच्या मुलाने माध्यमांना सांगितले.

सदर अपघात हारुगेरी पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडला असून घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेतली. पोलिसांकडून याचा पुढील तपास सुरू आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT