बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : मालमत्तेच्या वादातून चुलत भावावर खुनी हल्ला करणार्या दोघांना कॅम्प पोलिसांनी अटक केली. संतोष ऊर्फ पवन बबन लोहार (रा. खानापूर रोड कॅम्प) व गणेश सुतार अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. 31 मे रोजी या दोघांसह सहा जणांनी विनायक जोतिबा लोहार (वय 43, मूळ रा. हुलबत्ते कॉलनी, शहापूर सध्या खानापूर रोड, कॅम्प) यांच्यावर खुनी हल्ला केला होता.
विनायक यांची कॅम्पमध्ये वडिलोपार्जित मालमत्ता आहे. या दोन्ही कुटुंबामध्ये घराच्या वाटणीवरून वाद सुरू आहे. 30 मे रोजी सायंकाळी ते व कुटुंबातील काही सदस्य कॅम्प येथे गेले होते. यावेळी संतोषसह अन्य पाचजणांनी विनायकवर रॉड व कोयत्याने हल्ला केला होता. गुन्हा झालेल्या सहा जणांपैकी दोघांना अटक केली आहे.
घटनेनंतर सर्व हल्लेखोर पसार झाले होते. ते सांगलीतील एका लॉजमध्ये लपल्याचे कळल्यानंतर पोलिस पथक तिकडे गेले होते. पोलिसांची चाहूल लागल्यानंतर एक उंचावरून खाली उतरण्याचा प्रयत्न करताना पडला. झाडावर पडल्याने त्याला फार मार लागला नाही.
हेही वाचलंत का?