बेळगाव

निपाणी : वेश्या अड्ड्यावर छापा ; तिघांना अटक

मोनिका क्षीरसागर

निपाणी : पुढारी वृत्तसेवा
शहराबाहेरील एका हॉटेलमध्ये चालत असलेल्या वेश्या अड्ड्यावर शनिवारी रात्री उशिरा शहर पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकून आठ जणांवर कारवाई केली. यामध्ये एका परदेशी महिलेचा समावेश आहे. सीपीआय संगमेश शिवयोगी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सदर हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती विशेष पोलिस पथकाला मिळाली.

त्यानुसार सीपीआय शिवयोगी, शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर यांच्यासह कर्मचार्‍यांनी सापळा रचला. यावेळी मालक संजय भैरप्पा माळी (वय 35, रा. संकेश्वर), कर्मचारी अरुण जयपाल शेकन्नावर (वय 34, रा. हुक्केरी व परशराम खंडोबा चव्हाण (वय 35, रा. पिंपळे) यांच्यासह पाच महिला आढळून आल्या सर्वांना ताब्यात घेऊन न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने पाच महिलांची रवानगी बेळगाव येथील महिला सुधारगृहात केली. संजय, अरुण व प्रशांत यांना अटक करून पुढील तपास चालविला असल्याची माहिती सीपीआय शिवयोगी यांनी दिली.पाच महिलांपैकी चौघी कोल्हापूर, गडहिंग्लज येथील तर एक परदेशी महिला असल्याची माहिती शिवयोगी यांनी दिली.

महायुद्धाचे ढग | Pudhari Podcast

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT