बेळगाव

कर्नाटक : डीजी कार्यालयात ओएमआर शीटमध्ये फेरफार

मोनिका क्षीरसागर

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
पोलिस उपनिरीक्षक गैरव्यवहार प्रकरणात महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाच्या नियुक्‍ती विभागात उमेदवारांनी लिहिलेल्या ओएमआर शीटमध्ये फेरफार करण्यात आल्याचा तपास सीआयडी अधिकार्‍यांनी लावला आहे. ही माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पोलिस महासंचालक प्रवीण सूद यांची चांगलीच कानउघाडणी केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

पीएसआय परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांच्या ओएमआर शीट आणि संशयितांच्या ओएमआर शीट न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे (एफएसएल) पाठवण्यात आल्या होत्या. एफएसएलने दिलेल्या अहवालात ओएमआर शीटवर सात ते आठजणांच्या बोटांचे ठसे आढळल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय एका ओएमआर शीटमध्ये दोन ते तीन प्रकारच्या शाईचा वापर करण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, पोलिस महासंचालकांनी मुख्यमंत्र्यांना त्रोटक माहिती दिली. पोलिस खात्याची जबाबदारी केवळ परीक्षा केंद्राच्या सुरक्षेपुरती असल्याचे त्यांनी कळवले होते. पण, सीआयडी अधिकार्‍यांनी प्रकरणाची सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर बोम्मई यांनी सूद यांची चांगलीच कानउघाडणी केली. पोलिस महासंचालकांच्या कार्यालयातच ओएमआर शीटमध्ये फेरफार झाली. गुप्‍तचरांकडून याची माहिती मिळाली नाही का? या प्रकरणाचा कोणताच सुगावा कसा काय नाही लागला? कर्तव्यदक्ष म्हणून ओळख असणार्‍या अधिकार्‍यानेच अशा प्रकाराकडे दुर्लक्ष केले तर पोलिस खाते आणि राज्य सरकारचे नाव खराब होईल, अशा शद्बात सूद यांना सुनावण्यात आल्याची चर्चा आहे.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT