बेळगाव : गांजा विकणार्या व सोबत तलवार बाळगणार्या तरुणावर माळमारुती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सादिक महंमदशरीफ अत्तार (रा. अमनननगर) असे संशयिताचे नाव आहे.
सदर तरुण ऑटोनगरमधील आरटीओ ग्राऊंड परिसरात गांजा विकत असल्याची माहिती माळमारुतीचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांना मिळाली. उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी यांचे पथक बनवून त्यांनी छापा टाकण्याची सूचना दिली.
छाप्यात 8 हजार रूपये किंमतीचा 256 ग्रॅम गांजा, या कृत्यासाठी वापरलेली दुचाकी व 700 रूपये रोख सापडले. या तरुणाच्या दुचाकीची झडती घेतली असता यामध्ये धारदार तलवार देखील आढळून आली.