समीर मुल्ला pudhari photo
बेळगाव

Vijapur Crime : पायावर गोळी झाडून मुख्य आरोपीला अटक

जुबेर हत्या प्रकरण ; चार आरोपींना अटक, दोघांचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

विजापूर : शहरात भरदिवसा झालेल्या यासिन जुबेर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी समीर मुल्ला याच्या पायावर पोलिसांनी गोळीबार करून त्याला अटक केली. समीर मुल्ला याला अटक करण्यासाठी गेल्यावर त्याने देशी पिस्तूलातून पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता.

या कारवाईत स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी त्याच्या उजव्या पायावर गोळी झाडली. जखमी झालेल्या समीरला पोलिसांनी ताब्यात घेऊन उपचारासाठी विजापूर जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत विजापूरचे पोलिस अधिक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी माहिती दिली. यासिन जुबेर आणि समीर मुल्ला हे दोघेही मित्र असून विजापूरमधील टक्के परिसरात रहात होते. परिसरातील उरुसवेळी डीजेच्या मुद्द्यावरून दोघांच्या गटांत वाद झाला होता. यावेळी यासिनने समीरवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

या हल्ल्याच्या प्रकरणात यासिनला तुरुंगवास झाला होता. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आल्यावर तो आपल्यावर पुन्हा हल्ला करू शकतो, अशी भीती समीर आणि त्याच्या साथीदारांना वाटत होती. त्यामुळे यासिनच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सिन रुग्णालयात जाणार असल्याची माहिती आरोपींना मिळाल्यावर ६ जणांनी देशी पिस्तूलातून यासिनवर गोळीबार करून त्याची हत्या केली. याप्रकरणी आजतागायत चार आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य दोघा आरोपींचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT