बेळगाव : कोळीकोप्प गावात 7 एकरात तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) संचालक मंडळाने श्रीवारी ट्रस्टच्या निधीतून व्यंकटेश्वर स्वामी मंदिर बांधण्यास मान्यता दिली आहे.
कोळीकोप्पमध्ये सुमारे 20 कोटी रुपये खर्चून व्यंकटेश्वर मंदिर आणि सभागृह बांधण्याची पायाभरणी रेड्डी संघाने नुकतीच केली. मंत्री रामलिंग रेड्डी, एच.के. पाटील आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला होता. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंदिराच्या बांधकामासाठी 1 कोटी रुपयांचे अनुदान आधीच दिले आहे. आता, टीटीडी श्रीवारी ट्रस्टच्या निधीतून मंदिर बांधण्याची योजना आहे. परंतु, त्यांच्या अटी अद्याप स्पष्ट नाहीत.
बांधकामासाठी पाहणी करण्यासाठी गुरुवारपासून (दि. 18) ट्रस्ट सदस्य 4 दिवसांसाठी बेळगावला भेट देतील आणि येथील रेड्डी संघाशी चर्चा करतील. मंदिर बांधकामाला मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती ट्रस्ट अध्यक्ष बी. आर. नायडू यांनी दिली. टीटीडी श्रीवारी ट्रस्टच्या निधीतून कोळीकोप्प गावात 7 एकर जमिनीवर श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर बांधण्यास मान्यता बैठकीत देण्यात आली आहे.