बेळगाव : रेल्वे स्टेशनवर दाखल झालेली वंदे भारत एक्स्प्रेस. Pudhari Photo
बेळगाव

बेळगाव : ‘वंदे भारत’चे जल्लोषात स्वागत

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

बहुचर्चित वंदे भारत रेल्वेला सोमवारी प्रारंभ झाला. पुणे- हुबळी वंदे भारत रेल्वे (ट्रेन क्रमांक 20670) बेळगाव रेल्वे स्थानकावर 10 वाजून 15 मिनिटांनी दाखल झाली. ही रेल्वे बेळगावला नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा पोहाचली. यावेळी प्रवाशांकडून या गाडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सोमवारी पुणे येथून 2.15 वाजता रेल्वे सुटली. ही रेल्वे हुबळीला रात्री 10.45 वाजता पोहोणार होती. मात्र ती एक तास उशिरा हुबळी स्टेशनला पोहोचली.

पुण्यातून पहिल्या वंदे भारतला सोमवारी (दि. 16) हिरवा झेंडा दाखवण्यात आला. पुणे-कोल्हापूर-हुबळी वंदे भारत रेल्वेचे पंतप्रधान नरेंद्र मोदीनीं व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन केले. पुणे, कोल्हापूर, मुंबई आणि नागपूर येथून तीन वंदे भारत एक्स्प्रेस धावल्या. मुंबई-सोलापूर ही वंदे भारत एक्स्प्रेस या पूर्वी सुरू करण्यात आली आहे. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यावर पुणे ते कोल्हापूर व मुंबई ते कोल्हापूर या दोन गाड्या सुरू केल्या जाणार आहेत.

गाडी क्रमांक 20669 हुबळी- पुणे वंदे भारत एक्सप्रेस (त्रि-साप्ताहिक) प्रत्येक बुधवार, शुक्रवार आणि रविवारी हुबळी येथून पहाटे 5 वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी 1.30 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 02003 पुणे- हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस ही पुण्यातून 4.15 वाजता सुटेल व त्याच दिवशी 11.40 वाजता हुबळीला पोहोचेल. कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनासाठी केंद्रीय रेल्वे आणि जल शक्ती राज्यमंत्री व्ही. सोमण्णा कोल्हापुरात उपस्थित होते. त्यानंतर ते बेळगाव रेल्वे स्थानकावर पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसच्या स्वागत समारंभास उपस्थित राहिले. पुणे-हुबळी वंदे भारतचे धारवाड आणि हुबळी रेल्वे स्थानकांवर जल्लोषात स्वागत करण्यात आले.

उद्घाटन दिवशी वंदे भारतला उशीर

वंदे भारत रेल्वेमध्ये 530 प्रवाशांच्या आसनक्षमतेसह 8 बोगी आहेत. ट्रेन क्रमांक 02003 पुणे- हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस पुण्याहून सायंकाळी 2.15 वाजता सुटेली. त्याच दिवशी रात्री 10.45 वाजता हुबळीला पोहोचनार होती. मात्र ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आल्याने दोन तास उशिरा हुबळीत दाखल झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT