बेळगाव : वंदे भारत आजपासून धावणार

रेल्वेच्या तिकिटाचे दर जाहीर : 18 पासून प्रवाशांना उपलब्ध
Vande Bharat train
वंदे भारत रेल्वे
Published on
Updated on

बेळगाव : वर्षभरापासून बहुचर्चेत असलेल्या वंदे भारत रेल्वे सोमवारपासून धावणार आहे. रेल्वेचे तिकीट दर जाहीर झाले आहेत. आठडयातून तीन दिवस ही रेल्वे धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 सप्टेंबर रोजी रेल्वे सेवेला प्रारंभ करतील. यातून पत्रकार, अधिकारी, कर्मचारी प्रवास करणार आहेत. हुबळीहून सुटलेली रेल्वे बेळगावात दुपारी 3.15 वाजता पोहोचणार आहे. पुण्याहून सुटलेली वंदे भारत बेळगावला रात्री 9 वाजता पोहोचणार आहे.

Vande Bharat train
मिरज : मुंबई-कोल्हापूर-मुंबई ‘वंदे भारत’ लवकरच

दि. 18 सप्टेंबर रोजी हुबळी येथून रेल्वे पहिल्यांदा प्रवाशांना घेऊन धावणार आहे. रेल्वेच्या उद्घाटन समारंभाला बेळगाव केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा हे उपस्थित राहणार आहेत. हुबळी-बेळगाव पुणे दरम्यान आठवड्यातून तीन दिवस धावणार्‍या वंदे भारत एक्सप्रेस गाडीचे तिकीट दर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

बेळगावहून पुण्याला जाणार्‍या प्रवाशांसाठी ही रेल्वे अतिशय सोयीची ठरणार आहे. केटरिंग शुल्कासह हुबळी ते पुणे भाडे चेअर कारसाठी 1,530, एक्झिक्युटीव्ह क्लाससाठी 2,780 आणि कॅटरिंगशिवाय चेअर कारसाठी 1,185, एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी 2,385 आहे. बेळगाव ते पुणे प्रवासासाठी हे तेराशे रुपये शुल्क राहणार आहे. बुधवार, शुक्रवार आणि रविवारी, ट्रेन (20669) हुबळी येथून पहाटे 5 वाजता निघणार असून आणि दुपारी 1.30 वाजता पुण्याला पोहोचणार आहे.

Vande Bharat train
नागपूर ते सिकंदराबाद 'वंदे भारत एक्सप्रेस' सोमवारपासून धावणार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news