पावसाळ्याच्या सुरुवातीला तिलारी घाटामध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार संरक्षण कठड्यावर जावून आदळली 
बेळगाव

तिलारी घाट अवजड वाहतुकीसाठी बंद

करण शिंदे

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : गुगल मॅपवर रस्ता शोधत बेळगाव येथून गोव्यामध्ये दाखल होण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून तिलारी घाटातून दाखवण्यात येतोय. यामुळे बेळगाव परिसरातील शेकडो लोक या घाटातून प्रवास करतात. परंतु या घाटातील नागमोडी वळणामुळे चालकाला अंदाज येत नाही. यासोबतच नादुरुस्त रस्ते आणि खराब असलेले संरक्षण कठड्यांमुळे या मार्गांवर वारंवार अपघात होत आहेत. यामुळे बेळगावकरांनी मोठी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. अपघाताचे प्रमाण वाढल्याने अवजड वाहतुकीसाठी हा मार्ग आता 31 ऑक्टोबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

गुगल मॅपवरुन कर्नाटकातील अनेक अवजड वाहनांवरील चालक या घाटाचा अंदाज नसताना वाहने तिलारी घाटातून घेवून जाण्याचे धाडस करत आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अपघातामुळे वाहने घाटामध्ये अडकुन राहतात आणि त्यांमुळे वाहतूक कोंडीचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. या मार्गावर बेळगाव सह कर्नाटकातील अनेक वाहनांचा सातत्याने अपघात होत आहे. त्यामुळे मोटरसायकल इतर चारचाकी वाहनांच्या वाहतुकीस अडथळा होतो.

वाहतुकीसाठी दोन पर्यायी मार्ग उपलब्ध

तिलारी घाटातुन होत असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग आंबोली घाट तसेच कर्नाटक राज्यातील चोर्ला घाट असे दोन पर्यायी मार्ग सद्धया उपलब्ध आहेत. या मार्गांचा अवलंब केल्यास अपघाताचा धोका कळेल असे सध्याचे चित्र आहे. तिलारी घाटामध्ये अतिवृष्टी होत असल्याने घाटातील बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या बाजुचे संरक्षक कठडे जीर्ण आणि नादुरुस्त अवस्थेत आहेत. घाट अवजड वाहतुकीस अत्यंत धोकादायक असुन घाटातील तीव्र चढ-उतारामुळे रस्त्यांच्या वळणांवर वाहनांना वळण घेता येत नाही. त्यामुळे घाटामध्ये अनेक मोठे अपघात झाले आहेत. घाटामध्ये अवजड वाहतुकीमुळे तीव्र वळणांवर वाहन अडकून राहते. दरम्यान अपघातानंतर वाहन काढण्यासाठी क्रेन घेवून जाणे सुध्दा अवघड होते. मोठ्या क्रेनचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यास क्रेनचा सुध्दा अपघात झालेल्या घटना घडल्या आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT