The bodies of the two youths who drowned in the Kalammawadi dam were found
काळम्‍मावाडी धरणाच्या डाेहात निपाणीचे २ तरूण बुडाले हाेते  Pudhari Photo
बेळगाव

काळम्‍मावाडी धरणाच्या डोहात बुडालेल्या दाेन्ही तरूणांचे मृतदेह सापडले, कुटुंबांचा आक्रोश

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : मधुकर पाटील

आपल्या मित्रांसह वर्षापर्यटनासाठी निपाणीतील दोन मित्र काळम्‍मावाडी येथे आले होते. दरम्‍यान हे दोन्ही तरूण धरणाच्या डोहात काल (सोमवार) बुडाले होते. या दोन्ही तरुणांचा प्रशासनाकडून शोध घेण्यात येत होता. दरम्‍यान आज (मंगळवार) सकाळी यातील प्रतीक संजय पाटील या तरुणाचा मृतदेह तब्बल दोन तासांच्या शोध मोहिमेनंतर एनडीआरएफच्या तुकडीने शोधून काढला. यानंतर चार तास रेस्‍क्‍यू ऑपरेशन राबवून गणेश चंद्रकांत कदम या तरुणाचा मृतदेह शाेधून काढण्यात आला. रेस्क्यू ऑपरेशन युद्ध पातळीवर चालवून दाेन्ही तरूणांचे मृतदेह शाेधून काढण्यात आले. यावेळी मृत तरूणांच्या कुटुंबीयांचा आक्राेश हृदय पिळवटून टाकणारा हाेता.

प्रतीक पाटील व गणेश कदम हे दोघेजण सोमवारी आपल्य 13 मित्रांसह पर्यटनासाठी काळम्‍मावाडी धरण परिसरात गेले होते. यावेळी धरणाच्या 400 मीटर अंतरावर असणाऱ्या डोहात प्रतीक व गणेश दोघेजण बुडाले होते. त्यामुळे ते पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेले होते. त्यानंतर त्यांचा स्थानिक पोलीस प्रशासनासह कुटुंबिय नागरिकांनी पाणबुड्यांच्या साह्याने शोध घेतला. मात्र (सोमवार) सायंकाळी सहापर्यंत ही तपास मोहीम राबवण्यात आली.

दरम्यान या परिसरात पाऊस जास्त असल्याने शोधकार्य थांबवले होते. दरम्यान आज सकाळी कोल्हापूर येथील एनडीआरएफच्या तुकडीसह आपत्कालीन जीवन रक्षक दिनकर कांबळे यांना पाचारण करण्यात आले. त्यानुसार सकाळी आठपासून एनडीआरएफच्या तुकडीच्या जवानांनी डोहात बुडालेल्या दोन तरुणांचा शोध सुरू होता.

अखेर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्रतीक संजय पाटील या तरुणाचा मृतदेह मिळून आला. यानंतर चार तास रेस्‍क्‍यू ऑपरेशन राबवून गणेश चंद्रकांत कदम या तरुणाचा मृतदेह शाेधून काढण्यात आला. दरम्यान यावेळी तरूणांचे मृतदेह बाहेर काढल्‍यानंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

SCROLL FOR NEXT