बेळगाव

दम असेल तर सावरकरांचा फोटो काढून दाखवा : प्रमोद मुतालिक

अविनाश सुतार

चिकोडी : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस पक्षाचे नेते, कर्नाटक राज्याचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी वीर सावरकर यांच्याबदल अत्यंत वाईट वक्तव्य करून बेळगाव सुवर्णसौधमधील त्यांचा फोटो काढण्याचे वक्तव्य केले असून याचा मी निषेध करतो. दम असेल, तर सावरकारांचा फोटो काढून दाखवावा, असे थेट आव्हान श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी दिले आहे. आज (दि.८)  शासकीय  विश्रामगृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

खर्गे यांनी बेळगाव सुवर्णसौधमधील फोटो काढून नेहरुंचा फोटो लावतो, यासह इतर वाईट वक्तव्य केले होते. सावरकर हे ब्रिटिशांना सामील होऊन ब्रिटिशांचा पगार घेत होते. ब्रिटिशांना क्षमापत्र दिले होते, असे वक्तव्य केले आहे.

२३ वर्षे जेलमध्ये असणारे व दोन वेळा काळा पाणीची शिक्षा भोगलेले, ब्रिटिशांचा छळ सोसलेल्या क्रांतिकाराबद्दल बोलणे चुकीचे आहे. सुवर्णसौधमध्ये नेहरुंचा फोटो लावा, पण सावरकरांचा फोटो काढल्यास संपूर्ण राज्यात आंदोलन करण्याचा इशारा मुतालिक त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT