शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी हेस्कॉमने तयार केलेले मॉडेल. pudhari photo
बेळगाव

Farmer Solar Scheme | सौर पंपसेट बसवा, 80 टक्के सबसिडी मिळवा

हेस्कॉमच्या पुढाकाराने शेतकर्‍यांसाठी योजनो लाभ घेण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शेतात सौर पंपसेट बसविण्यासाठी हेस्कॉमने नवीन योजना सुरू केली असून यासाठी 80 टक्के सबसिडी देण्यात येत आहे. राज्यातील एमएमआरई आणि एमएतआरई यांच्या सहकार्याने शिवारात कूपनलिका व विहिरींमध्ये सौर पंपसेट बसवण्यासाठी शेतकर्‍यांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

सौर पंपसेट बसवून घेणार्‍या शेतकर्‍यांना 80 टक्के सबसिडी मिळणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन असून शेतकर्‍यांनी? ? माहितीसाठी www.souramitra.com या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन हेस्कॉमकडून करण्यात आले आहे. सध्या राज्यातील शेतकर्‍यांना कृषी पंपांसाठी मोफत वीजपुरवठा करण्यात आहे.

मात्र, काही कारणास्तव वीजपुरवठा खंडित झाल्यास शेतकर्‍यांचे नुकसान होते. शेतकर्‍यांना अखंड वीजपुरवठा व्हावा, यासाठी हेस्कॉमने ही योजना सुरू केली आहे. www.souramitra.com पोर्टलवर अर्ज करून सौर पंपसेट बसविण्यासाठी एजन्सी निवडण्याची संधी देण्यात आली आहे.

3 एचपी सौर पंपसेट बसविण्यासाठी 1 लाख 95 हजार 944 रुपये खर्च अपेक्षित आहे. यावर 80 टक्के सबसीडी असल्याने शेतकर्‍यांना केवळ 43,276 रुपये भरावे लागणार आहेत. 5 एचपीसाठी 2 लाख 83 हजार 995 रुपये खर्च आहे. मात्र, केवळ 57 हजार 733 रुपये भरावे लागणार आहेत.

7.5 एचपीसाठी 4 लाख 13 हजार 663 खर्च अपेक्षित असून 92,668 रुपये भरावे लागणार आहेत. 10 एचपीसाठी 5 लाख 13 हजार 18 रुपये खर्च येत आहे. मात्र, सबसिडीमुळे 1 लाख 91 हजार 983 रुपये भरावे लागणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्याासाठी शेतकर्‍यांना आधारकार्ड, शेतीचा उतारा देणे बंधनकारक आहे.

या ठिकाणी मिळवा माहिती

www.kredi.karnataka.gov.in या वेबसाईटवर पीएम कुसुम 2 घटक-ई योजनेबाबत माहिती देण्यात आली आहे. सौर पंपसेटची नोंदणी आणि देयकासाठी www.souramitra.com वरून किंवा केआरफडीएलच्या हेल्पर्लाइन क्रमांकांद्वारे (080-22202100 आणि 8095132100) माहिती मिळवावी. सदर नोंदणी प्रक्रियेदरम्यान प्राप्त झालेले ओटीपी स्वतः नोंदणीकृत करावेत.

शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी दोन सोलार कंपनीने पुढाकार घेतला आहे. कृषी पंपांसाठी सोलार जोडणी देण्यात येत असून हेस्कॉमतर्फे 80 टक्के सबसिडी दिली जात आहे. शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
प्रवीण चिकाडे, अधीक्षक हेस्कॉम, बेळगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT