शिमोगा : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटकाच्या प्रस्तावाला महाराष्ट्र रोखू शकत नाही. ते आमचं पाणी आहे, आमचा हक्क आहे. ते तुम्ही थांबवू शकत नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
कर्नाटकने जर अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे सरकार याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाईल, असा इशारा फडणवीस यांनी गुरुवारी दिला होता. त्यावर शिवकुमार यांनी पलटवार करताना इशाराही दिला आहे. पत्रकारांशी बोलताना शिवकुमार म्हणाले, फडणवीस म्हणतात की कृष्णा नदीच्या बाबतीत गॅझेट नोटिफिकेशनला (राजपत्र) 524 मीटरपर्यंत उंची वाढवण्याची परवानगी देणार नाही.