बेळगाव: मंगाईनगर तलावाशेजारी महापालिका अभियंत्यांशी चर्चा करताना रमाकांत कोंडुसकर, बंडू केरवाडकर आदी. Pudhari Photo
बेळगाव

मंगाई नगरातील तलावांभोवती संरक्षक जाळी उभारणार

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : लहान मुले आणि लोकांसाठी धोकादायक बनलेल्या मंगाई नगर, वडगाव येथील दोन्ही तलावांना सभोवताली संरक्षक जाळी उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शुक्रवारी (दि. २७) याबाबत महापालिकेच्या अभियंत्यांनी पाहणी केली.

मंगाई नगरच्या तलावात गुरुवारी (दि. २६) एकाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. या ठिकाणी असलेले दोन्ही तलाव रस्त्यालगत आणि भर वस्तीत असल्यामुळे लहान मुले आणि इतर लोकांसाठी धोकादायक बनले आहेत. त्यामुळे याबाबत म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. लोकांनी वारंवार मागणी करूनही तलावाच्या सभोवताली उभारण्यात येईल, असे सांगितले.

जाळी मारण्यात येत नाही, असे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. त्यामुळे आज महापालिकेते अभियंते सचिन कांबळे, परशुराम, ईश्वर कनबूर, अजय चव्हाण यांनी तलावांची पाहणी केली. यावेळी त्यांनी सोमवारपासून तलावाच्या सभोवताली सहा फूट उंच जाळी उभारण्यात येणार आहे.

यावेळी रमाकांत कोंडुसकर, मंगाई नगर रहिवासी संघटनेचे अध्यक्ष बंडू केरवाडकर, श्रीधर बिर्जे, आनंद गोंधळी, किरण पाटील, प्रशांत हणगोजी, रमेश कडोलकर, सहदेव रेमाण्णाचे, भालचंद्र उचगावकर आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT