बेळगाव : शहापुरात हनीट्रॅपचा संशय

सराफ व्यावसायिकाची पोलिसांत धाव; पोलिसांकडून तपास सुरू
honey trap scam
शहापुरात हनीट्रॅपचा संशय Pudhari Photo
Published on
Updated on

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

एका सराफ व्यावसायिकाला जाळ्यात ओढून हनीट्रॅप झाल्याचा प्रकार शहापूर परिसरात घडला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, त्यांनी अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ केली. सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहापूर परिसरात 45 वर्षीय सराफ व्यावसायिक असून, त्याच्या घरामध्ये तरुणी भाडोत्री राहते. ती विद्यार्थिनी असून, शहरातीलच एका कॉलेजमध्ये शिक्षण घेते. ज्या घरात ती भाडोत्री राहते, तेथे घरमालक पती-पत्नी व त्यांचा मुलगा असे तिघे जण राहतात.

honey trap scam
सातारा : फलटणमध्ये हनीट्रॅप; हॉटेल व्यावसायिकाला लुटले

या तरुणीने सराफ व्यावसायिकाची ओळख करून घेतली. ओळखीनंतर सदर तरुणीने आपल्याला फ्लॅट खरेदी करायचा आहे, असे सांगत संबंधित तरुणाकडून 15 लाखांची रक्कम घेतली आहे. यानंतर गेल्या काही दिवसांपासून ती पुन्हा 15 लाखाची मागणी करत होती. रक्कम दिली नाही तर तुझ्याविरोधात पोलिसांत तक्रार करते, असा दमही तिने या व्यावसायिकाला भरला आहे. त्यामुळे घाबरलेल्या तरुणाने मंगळवारी शहापूर पोलीस ठाणे गाठून पोलिसांसमोर कैफियत मांडली. तसेच तक्रार देण्याचा प्रयत्न केला.

honey trap scam
Honeytrap : इस्टाग्रामवरील तरुणीचा बिल्डरवर हनीट्रॅप, बुलाती है मगर जाने का नही…

फसवणूक की हनीट्रॅप?

सदर तरुणाने पोलिसांत जाऊन घडलेल्या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. परंतु, पोलिसांकडून हे प्रकरण हनीट्रॅपअंतर्गत नोंदवायचे की फसवणूक याबाबत रात्री उशिरापर्यंत वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेणे सुरू होते. पोलिसांनी फक्त या तरुणाचे म्हणणे ऐकून घेतले असून, सदर तरुणीचे म्हणणे ऐकून घेऊन मगच याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार एफआयआर करून घेतला जाईल, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणाची अद्याप नोंद झालेली नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news