Operation Sindoor Colonel Sofiya Qureshi
चिकोडी : भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी अड्डे नेस्तनाबूत केले. या 'ऑपरेशन सिंदूर' ची अधिकृत माहिती भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय वायुदलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचा नकाशा व 'ऑपरेशन सिंदूर'ची रणनीती अत्यंत स्पष्ट व आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने देशासमोर आणि जगासमोर सांगणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी या बेळगावच्या सून आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावचे ताजुद्दीन बागेवाडी यांच्याशी कर्नल सोफिया कुरेशी यांनी २०१५ साली प्रेम प्रेमविवाह केला. सोफिया या मूळच्या गुजरातच्या वडोदरा येथील आहेत. पती ताजुद्दीन हे देखील भारतीय सैन्यात कर्नल पदावर झाशी येथे कार्यरत आहेत. तर कर्नल सोफिया भारतीय लष्कराच्या संदेश वहन यंत्रणेत उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. लष्कराच्या पत्रकार परिषदेनंतर देशभरात कौतुकाचा विषय ठरलेल्या कर्नल सोफिया या रणरागिणीचा बेळगाव जिल्ह्याची सून असल्याचा अभिमान बेळगावकरांना वाटत आहे.
त्या १९९९मध्ये लष्करात भरती झाल्या. लष्कराच्या फोर्स-१८ च्या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. त्यांनी अशियायी देशांमध्ये झालेल्या अनेक लष्करी कारवायांमध्ये भाग घेतलेला आहे. इतर देशांसोबत केलेल्या अनेक कवायतींमध्ये भाग घेतलेल्या त्या एकमेव महिला कमांडर आहेत. तसेच भारतीय लष्करामध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी त्यांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. २००६मध्ये कांगो येथील संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता मोहीमेमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता.
सोफिया कुरेशी यांच्या घराण्याला लष्कराची पार्श्वभूमी आहे. त्यांचे आजोबा भारतीय लष्करात होते. सोफिया यांचे बंधू संजय कुरेशी देखील सैन्यात आहेत. माझे आजोबा आणि वडिल दोघांनीही सैन्यदलात सेवा बजावली आहे. माझ्या वडिलांनी १९७१च्या युद्धात इएमइ तुकडी मार्फत वडोदरा येथून सहभाग घेतला होता. माझ्या वडिलांचे आजोबा (आईचे वडिल) ब्रिटिश आर्मिमध्ये होते. त्यांनी नंतर १८५७च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. सोफिया यांचे कुटुंबिय वडोदरा येथे वास्तव्यास असते. त्यांना तीन भाऊ आणि एक बहीण आहे.