निपाणी : निपाणी शहराच्या आठवडी बाजारात भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे दर घसरले आहेत. परंतु फळभाज्यांचे दर मात्र तेजीतच आहेत. कोथिंबीर तर दहा रुपयाला दोन जुडी आहे. मेथी, पोकळा, माठ, पालक, करडई, शेपू, तांदळी यासारख्या भाज्या आता दहा रुपयाला एक जुडी तर पंधरा रुपयाला दोन जुडी आहेत.
दोडका 80-120, कारली 40-60, ढब्बू 40-60, ओली मिरची 40-50, गवार 60-80 रुपये किलो तर कोबी, फ्लॉवर, बीट 10-30 रुपये नग, वारणा 80, बिन्स 100, उसावरील शेंग 60-80 रुपये किलो. पोकळा, करडई, तांदळी, अंबाडी, पालक 10 रुपये जुडी. टोमॅटो 30-40 रुपये किलो आहे. पडवळची आवक सुरू झाली असून 20 ते 30 रुपये प्रतिनगप्रमाणे विक्री करण्यात येत आहे. रानकारलीही दोनशे रुपये किलोने विकली जात आहेत.
फळ बाजारात तोतापुरी आंब्यांची आवक अद्यापही मुबलक आहे. शंभर रुपयाला 4-6 आंबे मिळत आहेत; मात्र पावसाळी वातावरणाने खरेदीला प्रतिसाद नाही. पेरू, डाळिंब आणि ड्रॅगन फळांची आवकही वाढली. विदेशी सफरचंदाची आवकही चांगली आहे; मात्र त्यांचे दर आवाक्याच्या बाहेर आहेत. सफरचंद 250-300 रुपये किलो आहे.
किरकोळ बाजारात डाळींचे दर : तूरडाळ 125 ते 135 रुपये किलो, मूगडाळ 120 ते 130, हरभरा डाळ 88 ते 92, मसूर डाळ 90 ते 100, उडीद डाळ 140 ते 150 रुपये किलो.
कडधान्ये दर : हरभरा, मूग 120 ते 130, सोयाबीन 60 ते 80, मटकी 160 ते 180, साधा मसूर 100 ते 120, बेळगावी मसूर 240, हिरवे वाटाणा 160 ते 180, काळा वाटाणा, पांढरा वाटाणा 100 ते 120, वाल 140 ते 160, राजमा 140 ते 160, छोले 140 ते 160, चवळी 110 ते 120 रुपये किलो.
पोहे 56 ते 64, रवा 48, मैदा 48, शाबू 60 ते 72, वरी 100 ते 110, शेंगदाणे 120 ते 140, गूळ 50 ते 55, साखर 46 रुपये किलो आहे. तांदळाचे दर प्रतवारीप्रमाणे 40 ते 110, शाळू 36 ते 64, ज्वारी 32 ते 36 आणि गहू 40 ते 69 रुपये किलो दराने विक्री होत आहे. तेलाचे दर शेंगतेल 185 ते 220, सरकी 140 ते 150, सूर्यफूल 150 ते 165, खोबरेल तेल 280 ते 300, जेमिनी 165, पामतेल 135, तूप 600 ते 700 आणि डालडा 140 ते 180 रुपये किलो आहे.
फुलांचे प्रति किलोचे दर : निशिगंध 250-350, गलांडा 80-120, शेवंती 200-250, गुलाब 250-350, झेंडू 100-150, अॅस्टर 150-200 रुपये.
फळांचे प्रतिकिलोचे दर : सफरचंद 250-300, पेरू 80-100, मोसंबी 80-120, माल्टा 80-100, चिकू 60-80, डाळिंब 300-400, पेर 130-150, स्ट्रॉबेरी 200 रुपये, किवी 100 रुपयाला तीन नग, पपई प्रतवारीनुसार 30-40 रुपये नग, केळी जवारी 50-70, वसई 30-40 रुपये डझन, फणस 80-300, अननस 30-60 रुपये प्रतिनग.
नारळ आणि खोबर्याचे दर चढे असले तरी, डाळी, कडधान्ये, साखर, तेल यासारख्या इतर सर्व जीवनावश्यक साहित्याचे दर स्थिर आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून बाजारात नारळ आणि सुक्या खोबर्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. सध्या हे दर स्थिरावले असले तरी श्रावणातील वाढती मागणी पाहता पुरवठा मर्यादित असल्याने पुन्हा दरवाढ होण्याची शक्यता व्यापार्यांनी वर्तवली आहे. सुके खोबरे 330 ते 370 रुपये किलो तर नारळ प्रति नग 30 ते 60 रुपयांपर्यंत विकला जात आहे. ?