निपाणी नगरपालिकेच्या पाच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पालिका प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला Pudhari
बेळगाव

Nipani News | तासभर कचरा उपसला : दोन तोळे सोन्याचे दागिने शोधून काढले; निपाणीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रशासनाकडून गौरव

निपाणी नगरपालिकेच्या पाच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पालिका प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला

पुढारी वृत्तसेवा

Nipani Municipal Council

निपाणी : घरातील कचरा समजून चुकून नगरपालिकेच्या घंटागाडीत टाकलेले सुमारे दोन तोळे सोन्याचे दागिने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात तब्बल तासभर शोधून प्रामाणिकपणे संबंधित कुटुंबाच्या स्वाधीन करणाऱ्या निपाणी नगरपालिकेच्या पाच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पालिका प्रशासनातर्फे गुरुवारी सत्कार करण्यात आला. या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाची दखल घेत दै. ‘पुढारी’ने गुरुवारच्या अंकातून वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पालिका प्रशासनाने या कर्मचाऱ्यांचा गौरव केला.

प्रगतीनगर परिसरातील रहिवासी सुशीला बल्लारी यांनी वापरातील सुमारे दोन तोळे वजनाचे दोन सोन्याचे हार प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले होते. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे नगरपालिकेची घंटागाडी कचरा संकलनासाठी त्यांच्या घरासमोर आली. त्यावेळी सुशीला बल्लारी घराबाहेर गेल्या होत्या. त्यांचा मुलगा कपिल बल्लारी याने पिशवीतील वस्तू कचरा असल्याचे समजून ती घंटागाडीत टाकली.

काही वेळाने दागिने कचऱ्यासोबत गेल्याचे लक्षात येताच कपिल बल्लारी यांनी तातडीने पट्टणकुडी हद्दीतील पालिकेच्या कचरा प्रकल्पाकडे धाव घेतली. त्यांनी कर्मचाऱ्यांना प्रकार सांगून दागिने शोधून देण्याची विनंती केली.

घंटागाडी चालक विनायक ऐवाळे आणि कर्मचारी पिंटू सोनटक्के, अमर आवटे, विजय कुरंगे व महेंद्र कांबळे यांनी विलंब न करता कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोध सुरू केला. तब्बल तासभर कचरा उपसून तपासल्यानंतर त्यांना सोन्याची पिशवी सापडली. कर्मचाऱ्यांनी कोणताही मोह न ठेवता दागिने कपिल बल्लारी यांच्या स्वाधीन केले.रोख बक्षीस देऊन गौरव

पाचही कर्मचाऱ्यांच्या या प्रामाणिकपणाची दखल घेत आयुक्त गणपती पाटील यांनी त्यांना पालिका सभागृहात बोलावून रोख बक्षीस आणि बुके देऊन गौरविले. यावेळी अभियंते नागेंद्र बहादुरे, पठाण, आरोग्य निरीक्षक विनायक जाधव, युनियन अध्यक्ष लहू मधाळे, उपाध्यक्ष विजय कुरंगे आदी उपस्थित होते. ‘

'दै. पुढारी’चे विशेष आभार

या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक कार्याची दखल घेत दै. ‘पुढारी’ने गुरुवारी बातमी प्रसिद्ध केली होती. या वृत्ताची दखल घेत आयुक्त गणपती पाटील यांनी दूरध्वनीवरून ‘पुढारी’चे विशेष आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT