प्रकाश शिंदे Pudhari
बेळगाव

Nipani Accident | निपाणीजवळ दुचाकीवरील ताबा सुटल्याने अपघात; मुंबई महापालिकेतील सेवानिवृत्त सिक्युरिटी कर्मचारी ठार

यमगर्णी हद्दीत मुश्क धाब्याजवळ दुचाकीवरील ताबा सुटल्याने अपघात

पुढारी वृत्तसेवा

BMC Retired Employee Killed in Accident

निपाणी; पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर यमगर्णी हद्दीत मुश्क धाब्याजवळ दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात मुंबई महापालिकेतील सेवानिवृत्त सिक्युरिटी कर्मचारी प्रकाश भागोजी शिंदे (वय ५०, रा .बटकणंगले ता. गडहिंग्लज) हे जागीच ठार झाले. हा अपघात गुरुवारी (दि.२१) सकाळी झाला. घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात झाले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, मृत प्रकाश शिंदे हे मुंबई महापालिकेत सिक्युरिटी पदावर कार्यरत असल्याने ते कुटुंबीयसमवेत मुंबई येथेच वास्तव्यास होते.ते या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. दरम्यान ते मुंबई येथून दुचाकीवरून काही कामानिमित्त आपल्या मूळगावी परतत होते. यामध्ये त्यांची दुचाकी यमगर्णी हद्दीतील हॉटेल मुश्क धाब्याजवळ आली असता त्यांचा ताबा सुटला. त्यामुळे ते जोराने खाली कोसळल्याने जागीच ठार झाले.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळतात रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय सारापुरे यांनी घटनास्थळी धाव घेत याची माहिती बसवेश्वर चौक पोलिसांना दिली. त्यानुसार ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक एस.आय.कंबार, हवालदार लक्ष्मण कुदरी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृताची ओळख पटवून कुटुंबीयांना माहिती दिली.

याबाबत प्रकाश यांच्या पत्नी कांचन शिंदे यांनी रितसर फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक कंबार यांनी चालवला आहे. मृत शिंदे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT