अनिता नंद्याळकर  (Pudhari File Photo)
बेळगाव

Newlywed Woman Ended Life | मच्छे येथे नवविवाहितेने जीवन संपविले; पतीला अटक

पती, सासर्‍यावर खून, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेने गळफास घेऊन जीवन संपविलेची घटना मच्छे येथे उघडकीस आली. अनिता नीलेश नंद्याळकर (वय 25, रा. विजय गल्ली, मच्छे) असे नवविवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी वडगाव पोलिसांत पती व सासर्‍याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, पतीला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत माहिती अशी की, अनिता ही एका कंपनीमध्ये कामाला होती. तिथेच तिची नीलेश याच्याशी ओळख झाल्यानंतर दोघांची जवळीक वाढली. चार महिन्यांपूर्वी त्यांनी लग्न केले. शुक्रवारी रात्री पतीनीलेश व अनिता एकाच खोलीत झोपले होते. तेथून उठून स्वयंपाकखोलीत जाऊन अनिताने गळफास घेतला.

शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलीच्या घरचे दाखल झाले. दोघांनी आंतरजातीय विवाह केल्याने मुलीच्या कुटुंबीयांना हे मान्य नव्हते. त्यामुळे आपल्या मुलीचा घातपात केला असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला. त्यामुळे पोलिसांनी मृत विवाहितेचा पती व सासर्‍याविरोधात खुनाचा तसेच अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला असून पतीला अटक केली. मुलीचे वडील हणमंत कांबळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

मृत अनिता ही तीन महिन्याची गर्भवती असल्याची माहिती पोलिसांनी वैद्यकीय तपासणीचा हवाला देत सांगितले. वडगाव पोलिसांत नोंद झाली असून उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT