देशभरात बस आगीत 64 जणांचा मृत्यू  
बेळगाव

Bus Fire Accident : देशभरात बस आगीत 64 जणांचा मृत्यू

कर्नाटकातील तीन घटनांचा समावेश : 145 जण जखमी

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : बस आग लागून झालेल्या अपघातांमध्ये देशभरात 64 जणांचा मृत्यू तर 145 जण जखमी झाले आहेत. 1 जानेवारी 2021 ते 10 डिसेंबर 2025 दरम्यान कर्नाटकात अशा तीन बस अपघातांची नोंद झाली आहे. ज्यामध्ये 14 जण जखमी झाल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.

गुरुवारी एका ट्रकने बंगळूरला जाणाऱ्या बसला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात 10 जण मृत्युमुखी पडले. ट्रकने बसला धडक दिल्यानंतर आग लागली. संपूर्ण बसला आगीने वेढल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही.

17 डिसेंबर रोजी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, 1 जानेवारी 2021 ते 10 डिसेंबर 2025 दरम्यान देशभरात 45 घटना घडल्या. यामध्ये सर्व प्रकारच्या बसेसना आग लागली. या घटनांमध्ये 64 जणांचा मृत्यू झाला आणि 145 जण जखमी झाले आहेत. 24 ऑक्टोबर 2025 रोजी कुर्नूल येथे बस आणि मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला. याच काळात कर्नाटकमध्ये तीन घटना घडल्या असून ज्यामध्ये 14 लोक जखमी झाले.

अनेक खासगी आराम बसेसचे काम दर्जाच्या साहित्याचा वापर करून केले जाते. पूर्णपणे बांधलेल्या बसची क्रॅश टेस्टिंग फारशी केली जात नाही. काही प्रकरणांमध्ये अतिरिक्त इंधन टाक्या बसवण्यासारखे असुरक्षित बदल केले जातात. पडदे, गाद्या आणि अंतर्गत फर्निचर ज्वलनशील पदार्थांपासून बनवले जातात. ज्यामुळे आगीचा धोका वाढतो. तसेच चालकांना आग किंवा आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षित केले जात नाही, अशा अनेक त्रुटी असतात असे मत तज्ज्ञांनी मांडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT