Khadarwadi Electrical Accident Lineman Dies
बेळगावः बेळगावातील जैतनमाळ खादरवाडी येथील शेतात विजेच्या धक्क्याने एका लाईनमनचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि. १) सकाळी ८ च्या सुमारास घडली. राहुल पाटील (वय ३२, रा. येळ्ळूर) असे मृत लाईनमनचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी ८ च्या सुमारास खादरवाडीजवळील जैतनमाळ भागातील शेतामध्ये विजेचे रीडिंग घेण्यासाठी राहुल पाटील गेले होते. तेथे रीडिंग घेत असताना विजेच्या जोरदार धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
राहुल पाटील यांनी १५ दिवसांपूर्वी आपल्या मुलाचे बारसे साजरे केले होते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे गावात शोकाकूल वातावरण पसरले असून हळहळ व्यक्त केली जात आहे.