Laborers crushed by tanker while working on highway, 3 laborers killed on the spot
चिकोडी : काशिनाथ सुळकुडे
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मजूर काम करीत होते. यावेळी अचानक भरधाव वेगाने आलेल्या टँकरने ३ मजुरांना चिरडले. यामध्ये ३ मजूर जागीच ठार झाले तर अन्य गंभीर जखमी झाले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील इटगी क्रॉसवर हा भीषण अपघात घडला.
पुणे-बंगलुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर आज (रविवार) सकाळी मजूर काम करीत होते. यावेळी अचानक टँकर अंगावरून गेल्याने तीन जण ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली. या भीषण अपघातात उर्वरित एक मजुराची स्थिती गंभीर तर काही महिला मजुर जखमी झाले आहेत.
सर्व मजूर गुलबर्गा जिल्ह्यातील असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात रोजंदारी मजूरीसाठी बेळगाव येथे आले होते. या घटनेनंतर इतर मजुरांनी हंबरडा फोडला. कित्तूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत हा अपघात घडला आहे.