कुरुंदवाडच्या महिलेचे बसस्थानक चार तोळ्याचे दागिने लंपास 
बेळगाव

Belgaum Theft : कुरुंदवाडच्या महिलेचे बसस्थानक सर्कल येथून 4 तोळ्याचे दागिने लंपास

यात्रेसाठी माहेरी येत असताना घटना

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : कुरूंदवाड येथील महिला संध्या किरण लाटवडे (वय 40) या महिलेचे चार तोळे सोन्याचे दागिने, महत्त्वाची कागदपत्रे व रोख रक्कम असा एकूण 5 लाखाचा मुद्देमाल असलेली पर्स चोरट्यांनी हातोहात लंपास केली. ही घटना शुक्रवारी (दि.3) सायंकाळी बेडकीहाळ बसस्थानक सर्कल येथे घडली. घटनेची नोंद सदलगा पोलिसात झाली आहे. संध्या या आपल्या माहेरी सिध्देश्वर यात्रेसाठी बेडकीहाळ येथे येत होत्या.

याबाबतची अधिक माहिती अशी की, संध्या लाटवडे या आपली भाची मानसी जठार हिच्यासमवेत कुरुंदवाड येथून बोरगावपर्यंत हुपरी बसने आल्या होत्या. त्यानंतर त्या पुढील प्रवासासाठी बेडकीहाळला येण्यासाठी बोरगाव बस स्थानकावरून इचलकरंजी-निपाणी कर्नाटक बसमध्ये चढल्या. दरम्यान त्या बेडकीहाळ बसस्थानक सर्कल येथे उतरून त्या आपला भाऊ सचिन जठार यांच्यासमवेत दुचाकीवरून घरी गेल्या.

दरम्यान यावेळी त्यांच्या पिशवीत दागिने असलेली पर्स नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी याची माहिती सदलगा पोलीसांना दिली. त्यानुसार घटनास्थळी पोलिसांनी येऊन पाहणी केली. या घटनेमुळे महिला वर्गात घबराट पसरली असून पुढील तपास उपनिरीक्षक मल्लिकार्जुन बिरादार हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT